मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या, गावकऱ्यांनी प्रेयसीला मारहाण करत मृतदेहासोबत लावलं लग्न

अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या, गावकऱ्यांनी प्रेयसीला मारहाण करत मृतदेहासोबत लावलं लग्न

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

घटनेत प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या (Minor Dies by Suicide) केली आहे. तर, या घटनेनं वैतागलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबत प्रेयसीचं लग्न लावून दिलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate
कोलकाता 31 मे : कोरोनाच्या संकटादरम्यान आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या (Minor Dies by Suicide) केली आहे. तर, या घटनेनं वैतागलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) बर्दवान भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीनं असल्यानं मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याआधी या मुलानं आपल्या प्रेयसीला सांगितलं, की तो आत्महत्या करत आहे. यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर प्रेयसीला आपला फोटो पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. टारझनचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू; Joe Lara सोबत पत्नीचाही भीषण अपघातात अंत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगात कुंकू भरण्यात आलं. मृताच्या शेजाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे. या मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी तिनं माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात लवकरच कारवाई केली जाईल.
First published:

Tags: Crime news, Suicide news, Viral

पुढील बातम्या