Home /News /crime /

गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या इन्स्पेक्टरची ग्रामस्थांकडून धुलाई, पोलिसांनीच केली सुटका

गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या इन्स्पेक्टरची ग्रामस्थांकडून धुलाई, पोलिसांनीच केली सुटका

गावकऱ्यांच्या विनंतीनंतरही वारंवार गावात येऊन प्रेयसीला भेटणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी चांगलाच प्रसाद दिला आहे.

    मुझफ्फरपूर, 8 डिसेंबर: आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला (To meet girlfriend) शेजारच्या गावात आलेल्या सब-इन्स्पेक्टरची (Sub inspector) गावकऱ्यांनी धुलाई (Beaten) केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गावकऱ्यांना या अधिकाऱ्यानं आपल्या गावात येणं आणि गावातील मुलीसोबत अफेअर करणं ही बाब आवडत नव्हती. पोलीस अधिकाऱ्याला त्याची यापूर्वीही गावकऱ्यांनी (Warned many times) अनेकदा कल्पना दिली होती. मात्र काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या गुर्मीनंतर गावकऱ्यांनी त्याची जोरदार धुलाई केली. अशी घडली घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या सब-इन्स्पेक्टर शिव शंकर सिंह यांचं शेजारच्या गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी त्या गावात कर्तव्यावर यावं लागत असल्यामुळे त्या मुलीसोबत त्यांची ओळख झाली होती. मात्र आता ते गाव कार्यक्षेत्रात नसतानाही ते केवळ तरुणीला भेटण्यासाठी तिकडं जात असत. याचा गावकऱ्यांना राग होता आणि पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीमुळे गावाची बदनामी होत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला होता. आपल्या गावात येऊ नये आणि अशा प्रकारे गावातील मुलीसोबत संबंध ठेऊ नयेत, अशी विनंती ग्रामस्थांनी वारंवार अधिकाऱ्याला केली होती. अधिकाऱ्याने दाखवली गुर्मी घटनेच्या दिवशी सब-इन्स्पेक्टर पुन्हा त्या तरुणीला भेटण्यासाठी गावात गेले. त्यावेळी गावकरी एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एकदा इन्स्पेक्टरला विनंती केली. मात्र त्याने पोलीस असल्याची गुर्मी दाखवत गावकऱ्यांवर दादागिरी करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी केली धुलाई पोलिसांची दादागिरी सहन न झाल्याने त्यांना चांगलीच अद्दल घडवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि पोलिसाची चांगलीच धुलाई केली. गावकऱ्यांनी अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्यांना तुडवलं आणि पुन्हा गावात न शिरण्याची तंबीदेखील दिली. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली आणि त्याने घाबरत घाबरत कसाबसा पोलीस स्टेशनला फोन केला. हे वाचा- पोलिसांनी केली सुटका पोलिसाला मारहाण झाल्यानंतर काही वेळाने पोलीस स्टेशनमधून कुमक पाठवण्यात आली. काही पोलीस आले आणि जखमी अवस्थेतील पोलिसाला घेऊन निघून गेले. गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात पोलिसाविरुद्धच तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Love, Police

    पुढील बातम्या