Elec-widget

दबंगिरी करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात; संतप्त जमावाने केली मारहाण

दबंगिरी करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात; संतप्त जमावाने केली मारहाण

सुपैल इथे पोलीस अधिकाऱ्याला जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना. घटनेनंतर संतप्त पोलिसांच्या पथकाने ग्रामस्थांच्या घरात घुसून महिला आणि पुरुषांना केली मारहाण.

  • Share this:

सुपौल, 09 ऑक्टोबर: एका जमावाने पोलीस अधिकाऱ्याला जबरदस्त मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छातापूर इथले पोलीस ठाणे अध्यक्ष राघव शरण यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा छातापूर इथे पोलीस अधिकाऱ्याने महिलांना मारहाण केली होती. त्यावर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक आणि काठ्यांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे.

पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर संतप्त पोलिसांच्या पथकानं लोकांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही घटनांमुळे परिसरात परिस्थिती चिघळली असून तणावाचं वातावरण आहे. मंगळवारी दुचाकीचा अपघात झाला होता. या दुर्घटनेदरम्यान काही लोकांनी दुचाकीस्वार आणि त्याची दुचाकी ताब्यात घेतली. पोलिसांच्याच सांगण्यावरून दुचाकीस्वाराला सोडून दिले मात्र बाईक स्वत: कडे ठेवली.

दरम्यान पोलीस छातापूर पोलीस अध्यक्ष दुचाकी घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा पीडित आणि पोलिसांमध्ये शब्दीक बाचाबाची झाली. रागाच्या भरात पोलिसाने पीडित तरुणावर हात उचलला आणि वादाला तोंड फुटले. घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी दबंगिरी करणाऱ्या पोलिसाची धुलाई केली. पोलीस अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचं पाहून इतर पोलीस निरीक्षक आणि अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर मात्र पोलिसांनी महिला पोलिसांच्या सहय्यानं कुमक आणली आणि लोकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

<iframe width="910" height="728" src="https://www.youtube.com/embed/UN-h7BFMQrA" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

Loading...

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 12 हून अधिक महिला गंभीर जखमी आहेत.  पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. छातापूर पोलीस अध्यक्षांवर या प्रकरणी कारवाई करावी अशी संतप्त ग्रामस्थांची मागणी आहे.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...