विरारमध्ये भररस्त्यात महिलेचा राडा; रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याचा Live Video

विरारमध्ये भररस्त्यात महिलेचा राडा; रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केल्याचा Live Video

महिलेने रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केला

  • Share this:

विरार, 22 ऑक्टोबर : विरारमध्ये 50 वर्षीय महिला व एका रिक्षा चालकाचा भर रस्त्यात हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विरार पश्चिम अग्रवाल सिटी परिसरातील रिक्षा थांब्यावर काल दुपारच्या वेळी ही घटना घडली. हाणामारीत महिलेने खुलेआम हातात चाकू घेऊन रिक्षा चालकावर वार केल्याचे दिसून येत आहे.  हातात चाकू घेऊन वार करणाऱ्या महिलेचे नाव मंजिती कौर भोसले असे आहे. तर या घटनेत रिक्षाचालक दुर्गेश पाटील जखमी झाला आहे.

काल दुपारी अग्रवाल सिटीच्या सर्कल वर महिलेची दुचाकी आणि रिक्षा समोरा-समोर आल्याने हा अपघात होता होता राहिला, त्यावरुन महिला आणि रिक्षा चालकामध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये महिलेने रिक्षाचालकावर चाकूने वार केला आणि रिक्षा चालकाने हाताने मारहाण केली. या सर्व प्रकारात रिक्षा चालक जखमी झाला आहे. यावेळी तेथील काही जणांनी या हाणामारीचा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला रिक्षाचालकावर हल्ला करीत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा-रक्ताच पाणी करुन ज्याला वाढवलं त्याच लेकराचा आईने कुऱ्हाडीने कापला गळा

या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकाच्या तक्रारी वरुन महिलेवर 324 दखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यात नकार दिला आहे. मात्र या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. नेमका कशामुळे हा वाद सुरू झाला याचाही तपास केला जाणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 22, 2020, 9:50 PM IST

ताज्या बातम्या