शहापूर, 30 सप्टेंबर : राज्यातील खड्ड्यांची समस्या (The problem of potholes) ही काही नवी नाही. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहेत. असाच एका अपघाताचा व्हिडीओ (Accident Video) समोर आला आहे. ही घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. शहापूर तालुक्यात खड्डे वाचविण्याच्या नादात चार चाकी कार थेट भातसा नदी पात्रात गेल्याचं दिसून येत आहे. या घटनेनंतर आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले. यावेळी त्यांनी कार चालकाला बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी (No death) झालेली नाही.
शहापूर तालुक्यातील भातसा नदीवरील सापगाव पुलावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांपासून वाचण्याच्या नादात शेणवे येथील विकास शिर्के यांचा आपल्या कारवरील ताबा सुटल्याने ही कार थेट भातसा नदीत पात्रात पडली. सुदैवाने येथे उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवून कार चालकाला बाहेर काढून उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शहापूर-मुरबाड रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा-दिर-वहिनीमधील संबंधामुळे लग्नाच्या पहिल्याच रात्री घडला धक्कादायक प्रकार
शहापूर तालुक्यात खड्डे वाचविण्याच्या नादात चार चाकी कार थेट भातसा नदी पात्रात गेल्याचं दिसून येत आहे. pic.twitter.com/O2PK4NZFc4
— News18Lokmat (@News18lokmat) September 30, 2021
कसा झाला अपघात?
शेणवा येथील विकास शिर्के हे आपल्या 4 व्हीलर कारमधून शहापुरच्या दिशेने जात असताना शहापूर तालुक्यातील सापगाव जवळील भातसा नदी पुलावरून त्यांची गाडी जात असताना खड्डे चुकवताना पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या 407 या टेम्पोने विकास शिर्के यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्यांची 4 व्हीलर कार ही समोरून येणाऱ्या इको गाडीवर जाऊन आदळून पुलावरून खाली नदीपात्रात पडली. सुदैवाने त्या ठिकाणी सापगाव येथील प्रत्यक्ष दर्शी, पंकज अंदाडे, रमेश अंदाडे व मंगल हूमने सरलांबे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदी पत्रात उड्या मारल्या व पाण्यात बुडत असतांना विकास शिर्के यांना वाचवले आणि पाण्याच्या बाहेर काढले. मात्र त्यांची 4 व्हीलर ही बघता बघता डोळ्यासमोर भातसा नदी पत्राच्या पाण्यात बुडाली. दरम्यान महाराष्ट्र शासनाची 407 गाडी चालक हा एवढा विचित्र गाडी चालवत होता की तो चारचाकी गाडीला ठोकायला आला होता. माझे नशीब की तो मला कट मारून पुढे गेला व त्याने 4 व्हीलरला ठोकले आणि ती कार नदीमध्ये पडली असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Car, Live video