Home /News /crime /

Video : मुलाला लागलं गांज्याचं व्यसन; संतापलेल्या आईने दिली भयावह शिक्षा

Video : मुलाला लागलं गांज्याचं व्यसन; संतापलेल्या आईने दिली भयावह शिक्षा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

सोशल मीडियावर या आईची खूप चर्चा सुरू आहे. गांज्याचं व्यसन सोडविण्यासाठी हा योग्य उपाय असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे.

    नवी दिल्ली, 4 एप्रिल : प्रत्येक आईला वाटतं की, त्याच्या मुलाने आयुष्यात काही तरी चांगली कामगिरी करावी. आपल्या देशात तर आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपवास, पूजासह नवसही मागते. मुलाला थोडा जरी त्रास झाला तरी तिला सहन होत नाही. मात्र जर कोणत्या मुलाला लहान वयात नशेचं व्यसन लागलं तर मुलाला वाचविण्यासाठी आई सर्व मर्यादा ओलांडते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका आईने नशेच व्यसन लागलेल्या आपल्या मुलाला अशी शिक्षा (ganja addict) दिली की, तुम्ही असा विचारही करू शकत नाही. 15 वर्षांच्या मुलाच्या डोळ्यात घातलं लाल तिखट या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका मुलाला खांब्याने बांधलं आहे आणि एक महिला त्याच्या डोळ्यात लाल तिखट घालून वचन मागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आईच आहे. आपल्या मुलाला गांज्याचं व्यसन लागल्याचं कळताच महिलेचा संताप झाला. आणि तिने त्याला खांब्याने बांधलं आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. जोपर्यंत तो नशा सोडण्याचं वचन देत नाही तोपर्यंत त्याला खांब्याला बांधून ठेवलं. मुलगा वेदनेने तडपत होता, मात्र तरीही आईला वचन दिल्यानंतरच महिलेने त्याची सुटका केली. हे ही वाचा-VIDEO : लग्न मंडपात नवरी असं काही करू लागते की, नवरदेवाचाही बसत नाही विश्वास; नातेवाईकही हैराण तेलंगणाची घटना.. ही घटना तेलंगणाची आहे. सोशल मीडियावर या आईची खूप चर्चा सुरू आहे. गांज्याचं व्यसन सोडविण्यासाठी हा योग्य उपाय असल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. तर काही जण यामुळे मुलाच्या डोळ्याला इजा होऊ शकते असंही म्हणत आहेत. देशात गांज्यावर बंदी.. 1985 मध्ये मेंदूवर गांज्याचा होणारा परिणाम पाहता NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances)अॅक्ट अंतर्गत यावर बंदी आणण्यात आली. याला इंग्रजीत कॅनेबिस (Cannabis) म्हटलं जातं. याची नशा केल्यानंतर मेंदूत परिणाम होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Drugs, Video Viral On Social Media, Videos viral

    पुढील बातम्या