मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महिलेसोबत सामूहिक बलात्काराचा Video केला Viral; पीडितेच्या पतीने मोबाइल पाहताच हादरला!

महिलेसोबत सामूहिक बलात्काराचा Video केला Viral; पीडितेच्या पतीने मोबाइल पाहताच हादरला!

आपल्या पत्नीवर बलात्कार झाल्याचं पतीला माहितही नव्हतं.

आपल्या पत्नीवर बलात्कार झाल्याचं पतीला माहितही नव्हतं.

आपल्या पत्नीवर बलात्कार झाल्याचं पतीला माहितही नव्हतं.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 3 जुलै : बिहारमध्ये एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे आरोपींनी आधी महिलेसोबत (gang rape) बलात्कार केला आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. यानंतर त्या नराधमांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. जेव्हा हा व्हिडीओ पीडितेच्या पतीने पाहिला तेव्हा तो हादरलाच. ज्यावेळी पतीने पीडितेला याबद्दल विचारलं तेव्हा तिने नेमका प्रकार सांगितला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ एक आठवड्यांपूर्वीचा आहे.(Video of gang rape with a woman goes viral The victims husband was shocked to see the mobile)

व्हिडीओमध्ये महिलोसोबत बलात्कार केला जात आहे. महिलेवर अत्याचार करीत असताना ती नराधमं व्हिडीओ शूट करीत होता. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. शेवटी या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पीडितेने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी महिलेची चाचणी केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे महिलांनी अशा प्रकरणात शांत न राहता पोलिसांकडे याबाबत रीतसर तक्रार करणं आवश्यक आहे.

हे ही वाचा-सासरा आणि सुनेने नात्याची मर्यादा ओलांडली; अखेर हत्यांकांडानेच झाला शेवट

ही घटना 23 जूनची आहे. जेव्हा महिला शौचासाठी बाहेर गेली होती, तेव्हा गावातील सहा जणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला. इतकच नाही तर घटनेनंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेली महिला घरी पोहोचली, मात्र तिने कोणाला काहीच सांगितलं नाही. काही दिवसात हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पीडितेच्या पतीच्या मोबाइलवरदेखील पोहोचला. यामुळे पती खूप नाराज झाला. त्याने पत्नीला याबद्दल विचारलं तेव्हा तिने नेमका प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Gang Rape