भिवंडी, 14 डिसेंबर : लहान मुलं ते तरुणांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) ची चांगलीच लोकप्रियता पाहण्यास मिळते. याच धर्तीवर मुंबई जवळील भिवंडीमध्ये WWE प्रमाणे फ्री स्टाईल फाईट क्लबचा पदार्फाश झाला आहे. बेकायदेशीररित्या भरवण्यात आलेल्या या फाईट क्लबचा (Fight Club) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे गर्दी करून एकत्र येण्यास मनाई असताना देखील भिवंडी शहरातील पिरानी पाडा येथे कोणतीही परवानगी न घेता फ्रिस्टाईल फाईट क्लबचे आयोजन करण्यात आले होते. या क्लबमध्ये शेकडो तरुण विनामास्कचे एकत्र आले होते. या ठिकाणचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सदर घटना समोर आली आहे.
या ठिकाणी आलेल्या तरुणांपैकी एकानेही तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टन्ससिंगचा पार फज्जा उडवला होता. या ठिकाणी एक दोन मिनिटांची फाईट सुद्धा पाहण्यास मिळाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचं पालन न केल्याबद्दल व कोणतीही परवानगी न घेता जमाव एकत्रित केल्याबद्दल पोलिसांनी आयोजकांविरोधात 188,37,1,3,35 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.