Home /News /crime /

भाजप आमदाराच्या हत्येचा रचत होते कट; काँग्रेस नेत्याचा धक्कादायक VIDEO आला समोर

भाजप आमदाराच्या हत्येचा रचत होते कट; काँग्रेस नेत्याचा धक्कादायक VIDEO आला समोर

काँग्रेस नेत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video of Congress Leader) झाला आहे. भाजप आमदारासोबतच्या वैमनस्यापोटी काँग्रेस नेता त्यांची हत्या करण्याबाबत बोलताना दिसत आहे (Planning of BJP MLA Murder).

    बंगळुरू 02 डिसेंबर : कर्नाटकमधून (Karnataka) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक काँग्रेस नेता भाजप आमदाराच्या हत्येची योजना आखत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video of Congress Leader) झाला आहे. भाजप आमदारासोबतच्या वैमनस्यापोटी काँग्रेस नेता त्यांची हत्या करण्याबाबत बोलताना दिसत आहेत (Planning of BJP MLA Murder). व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या काँग्रेस नेत्याचं नाव गोपालकृष्ण आहे. गोपालकृष्ण व्हिडिओमध्ये कर्नाटकचे भाजपचे आमदार एसआर विश्वनाथ यांची हत्या आणि त्यांना संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत. कर्नाटकातील येलाहंका येथील भाजप आमदार विश्वनाथ यांच्या हत्येची योजना गोपालकृष्ण कथितपणे आखत असल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ तीन मिनिटांचा आहे. इंडिया टुडेच्या म्हणण्यानुसार, यात काँग्रेस नेता दुसऱ्या एका व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहे. 'मारून टाका, आमदाराला संपवा' असं संभाषणात ऐकू येतं. 1 कोटी रुपये होऊ दे. ठीक आहे. चला संपवूया, कोणालाही हे समजलं नाही पाहिजे... हे फक्त आपल्यातच असायला हवं.' ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, हा व्हिडीओ कधीचा आहे हे शोधलं जात आहे. पुढील कारवाईसाठी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या व्हिडिओवरून राज्यात काँग्रेस आणि भाजपमधील शाब्दिक युद्धही तीव्र झाले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितलं की, कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. या मुद्द्यावर भाजप आमदार विश्वनाथ यांच्याशीही बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी सांगितलं की, 'मला काल रात्री व्हिडिओबद्दल समजलं. एफआयआर नोंदवण्याचा निर्णय पोलीस घेतील. गरज पडल्यास आमदारांला सुरक्षा दिली जाईल. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Karnataka, Mla, Murder, Shocking video viral

    पुढील बातम्या