मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : मराठी-कानडी वाद पेटला; कन्नड संघटनेने मराठी फलकावर काळं फासलं

VIDEO : मराठी-कानडी वाद पेटला; कन्नड संघटनेने मराठी फलकावर काळं फासलं

इतका प्रकार घडल्यानंतरही बेळगाव पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

इतका प्रकार घडल्यानंतरही बेळगाव पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

इतका प्रकार घडल्यानंतरही बेळगाव पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

बेळगाव, 12 मार्च : काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कानडीतून फलक लावणाऱ्यांना इशारा दिला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा कानडीतील फलक दिसला तर दुकान बंद करण्यात येईल, असं म्हणत शिवसेना स्टाइल समाचार घेतला होता. दरम्यान यावर कानडी संघटनांनी थयथयाट केल्याचं दिसून येत आहे. (Marathi Kannada controversy The Kannada organization Marathi board thrown)

कन्नड रक्षण वेदिका संघटनेने बेळगावमध्ये धुमाकूळ घातला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत वेदिका संघटनेचे कार्यकर्ते गावकरी नावाच्या एका हॉटेलमध्ये शिरल्याचे दिसत आहे. या कार्यकर्त्यांनी गावकरी लिहिलेल्या फलकावर काळे फासले. इतकच नाही तर त्यांनी मराठीत लिहिलेला फलक हटवला. या घटनेनंतर सीमाभागात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा-VIDEO : कोल्हापूरची अजब कहाणी; गावात शून्य मतदान, उमेदवारानेही केलं नाही VOTE

इतकचं नाही तर वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गाडीला काळं फासण्यात आलं. इतका प्रकार घडल्यानंतरही बेळगाव पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. (Marathi Kannada controversy erupts The Kannada organization Marathi board thrown) कोल्हापूरमधील शिवसेनेच्या आंदोलनानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेचे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कन्नड संघटनेच्या भूमिकेमुळे सीमाभागात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Belgaum, Kolhapur, Shivsena