Home /News /crime /

VIDEO : फुकटच्या शहाळ्यांसाठी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांची लगबग; अपघातानंतरच चित्र पाहून हैराण व्हाल

VIDEO : फुकटच्या शहाळ्यांसाठी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांची लगबग; अपघातानंतरच चित्र पाहून हैराण व्हाल

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

धुळे, 21 ऑक्टोबर : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Solapur National Highway) बीड (Beed News) जिल्ह्यातील कोळवाडी जवळ शहाळ्यांचा ट्रक पलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने तिथे उभे असलेल्या दोन रिक्षांना जोराची धडक (Road Accident) दिली. या अपघातात 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर एकापाठोपाठ आठ वाहने अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. यात मदत कार्य करणाऱ्या एका पोलिसालाही वाहनाने जोराची धडक दिल्याने तोही जखमी झाला. अपघातानंतर पलटी झालेल्या नारळाच्या ट्रकमधील नारळ घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.  याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहीवेळा नंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. हे ही वाचा-सावधपणे गाडी चालवूनही धडकली तर...; अपघाताबाबत सर्वाच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सोलापूर-धुळे महामार्गावर आज सकाळी नारळ घेऊन जाणारा टेम्पो ( क्र . एच . आर . 55 बी.ई. 8397 ) हा कोळवाडी जवळ उलटला. याची माहिती महामार्ग पोलिसांसह आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याठिकाणी महामार्ग पोलीस पीएसआय यशराज घोडके आणि त्यांचे कर्मचारी हे मदत कार्यासाठी तेथे आले होते. मदतकार्य सुरू असताना तेथे रिक्षा ( क्र. एम. एच. 23 ए. आर. 0468 ) तसेच भाजीपाला घेऊन बीडकडे येणारा रिक्षा ( क्र . एम . एच . 23. एक्स 5470 ) व ( क्र. एम.पी. 68 सी. 2618 ) रस्त्याच्या बाजुला उभे होते. या वेळी सिमेंट घेऊन येणारा ट्रक क्र . ( एम . एच . 18 ए . ए . 9679 ) रिक्षा व कारला धडकला. या वेळी एका रिक्षात बसलेली वैष्णवी आनंद आडगळे ( रा . शाहूनगर बीड , वय 13 ) हिचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. धनंजय बापू वाघमारे ( वय 39 , रा . पाली ) हे जखमी झाले आहेत व दुसऱ्या रिक्षातील रविंद्र नवनाथ ढाकणे ( वय 45 , रा . ढाकणवाडी ता . केज ) हे जखमी झाले आहेत .
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Road accident, Solapur

पुढील बातम्या