मुंबई, 25 नोव्हेंबर : मुंबईत (Mumbai )बनावट फॉर्म कॉल सेंटरला (fake call center) मुंबई पोलिसांनी पदार्फाश केला आहे. अमेरिकन नागरिकांना बंदी असलेली औषधं देण्याचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या एका अकाऊंटटला मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, विशाल घनश्याम सोनी असं आरोपीचं नाव आहे. मालाड येथील लिंक रोडवर विशाल घनश्याम सोनी याने आपल्या कार्यालयात कॉल सेंटर थाटले होते. याबद्दल गुप्त माहिती खबऱ्याकडून मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी विशाल सोनीच्या कार्यालयावर सोमवारी रात्री छापा टाकला. यावेळी कार्यालयामध्ये अनेक लोकं फेक कॉल करताना आढळून आले. पोलिसांनी विशाल सोनीला ताब्यात घेतले आहे.
KBC मध्ये विचारलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल?
फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये पदवीधर असलेल्या सोनीकडे रात्री 11 जण त्याच्या अकाउंटन्सी फर्ममध्ये काम करत होते. रात्रीच्या वेळी ते बनावट ओळख निर्माण करून कॉल सेंटरमध्ये त्याच्यासाठी काम करायचे.
आरोपी सोनी हा त्याच्या टीमकडून अमेरिकन पर्यटकांना फोन करून त्यांना व्हायग्रा, सियालिस आणि लेवित्रा यासारख्या लैंगिक समस्याच्या गोळ्या देण्याचे आश्वासन देत होता. धक्कादायक, म्हणजे यातील बऱ्यात औषधांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.
सोनी याच्याकडे काम करत असणारी टोळी अमेरिकन लोकांना आपण अमेरिकेतून बोलत आहोत, असं भासवत होते. अमेरिकन लोकांच्या शैलीत ते त्यांच्याशी संवाद साधत होते. समोरील व्यक्तीचा विश्वास बसल्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सना खानच नाही या कलाकारांनी स्विकारला अध्यात्माचा रस्ता, नावं वाचून थक्क व्हाल
आरोपी सोनी हा लॉकडाउन लागण्याआघी याआधी कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याच्याकडे कॉल सेंटरचा अनुभव होता. पोलिसांनी सोनीला अटक केली असून त्याच्या टीम काम करणाऱ्या 11 जणांना साक्षीदार बनवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.