• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • विकृतीचा कळस! मुक्या जीवांवर बलात्कार करून व्हिडिओ बनवायचा डॉक्टर, चेहरा पाहूनच भीतीनं पळायचे प्राणी

विकृतीचा कळस! मुक्या जीवांवर बलात्कार करून व्हिडिओ बनवायचा डॉक्टर, चेहरा पाहूनच भीतीनं पळायचे प्राणी

40 वर्षीय डॉक्टरला 16 मार्च रोजी त्याच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांसोबत सेक्स (Sex with Animals) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

  • Share this:
नवी दिल्ली 07 ऑगस्ट : मुके प्राणी (Animals) माणसांचे विश्वासाचे, जिव्हाळ्याचे सखेसोबती असतात. वेळप्रसंगी ते आपल्या मालकासाठी जीवही देतात; पण माणूस आपल्या स्वार्थासाठी त्यांचाही वापर करून घेतो. कुत्रा, मांजर, पोपट अशा काही प्राण्यांना माणसं पाळतात. काही लोक अत्यंत प्रेमानं यांचा सांभाळ करतात. प्राण्यांनाही दुखतं, खुपतं, आजार होतात म्हणून आता त्यांनाही डॉक्टरांकडे नेलं जातं. पण एखादा पशुवैद्यक म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर (Veterinary Doctor) मुक्या प्राण्यांशी घाणेरडं कृत्य करत असेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही; पण अशी एक धक्कादायक घटना अमेरिकेत नुकतीच उघडकीस आली आहे. माणूस बोलू शकतो, आपलं दुःख, त्रास सांगू शकतो; पण मुके बिचारे प्राणी काहीही सांगू शकत नाहीत. माणसाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना देव मानलं जातं; पण काही वेळा देवाचं स्थान दिलेल्या डॉक्टरांचे असे काही अनुभव येतात की माणसाचा विश्वासच उडतो. असे काही विकृत डॉक्टर माणसांनाच नाही तर मुक्या, निष्पाप प्राण्यांशीही राक्षसासारखे वागताना दिसून येतात. अमेरिकेतील या पशुवैद्यकानंही आपल्या कृत्यानं डॉक्टरी पेशालाच नव्हे तर माणूस जातीला लाज आणली आहे. या विकृत डॉक्टरचं नाव प्रेंटिस मॅडेन (Prentiss Madden) असं असून, हा नराधम डॉक्टर या मुक्या प्राण्यांना आपल्या वासनेची शिकार बनवत असे. त्याला बघताच मुके प्राणी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असत. आसामचा मालक, बंगालची नॅनी; मालकाच्या मुलीला पुण्यात विकण्याचा कट, असं फुटलं बिंग 40 वर्षीय डॉक्टरला 16 मार्च रोजी त्याच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांसोबत सेक्स (Sex with Animals) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्या क्लिनिकची तपासणी केली गेली, तेव्हा पोलिसांना त्याच्या संगणकावर हजारो अश्लील फोटो, व्हिडिओ सापडले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, असे अनेक लोक समोर आले ज्यांच्या कुत्र्यांवर (Dogs) प्रेंटिसने उपचार केले होते. या लोकांनी सांगितले की, ते प्रेंटिसला प्राण्यांचा उत्तम डॉक्टर समजत असत; पण त्यांचं कुत्र त्याला पाहिलं की घाबरून जात असे. त्यांना वाटायचं की त्यांचं कुत्रं इंजेक्शन आणि औषधांच्या भीतीमुळे प्रेंटिसकडे जायला घाबरत असेल. पण हे प्रकरण उघडकीस आल्यानं आता त्यांना त्यांच्या कुत्र्यांचे प्रेंटिसला बघून घाबरण्याचे कारण कळले आहे. Shocking! पोलीस चीफ केस कापण्यासाठी लागले मागे; जवानाने बंदुक काढली आणि... मिआमी फेडरल कोर्टात (Miami Federal Court) या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यावेळी प्रेंटिसने आपण प्राण्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचे कबूल केलं. लोक जेव्हा उपचारासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये प्राणी आणत, तेव्हा उपचाराच्या निमित्ताने तो त्या प्राण्यांना आतल्या खोलीत घेऊन जात असे आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असे. एवढेच नव्हे तर हा विकृत माणूस आपल्या मोबाईलमध्ये याचा व्हिडीओ बनवून, ते व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करत असे. प्रेंटिसनं आपल्यावरील सर्व आरोपांची कबुली दिली असल्यानं या महाभयंकर गुन्ह्यासाठी त्याला सुमारे 87 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ऑक्टोबरमध्ये शिक्षा सुनावली जाईल. आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसांसाठी जीव देणाऱ्या मुक्या, निष्पाप प्राण्यांनाही आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या या डॉक्टरची ही विकृती म्हणजे हिनपणाचा कळस आहे. मुक्या जीवांना यातना देणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच मागणी समाजातून होत आहे.
First published: