• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • बारबालांच्या नादी लागला, भाजीविक्रेता घरफोड्या झाला, डोंबिवलीतील घटना

बारबालांच्या नादी लागला, भाजीविक्रेता घरफोड्या झाला, डोंबिवलीतील घटना

काही मित्रांच्या संगतीने लागलेल्या दारूची बाटली अन् बारबालांच्या नादात तो सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार झाल्याने पोलीसही चक्रावून गेले.

  • Share this:
डोंबिवली, 01 जानेवारी :  दिवसभर भाजीपाली विकायचा आणि रात्री घरफोडी करणाऱ्या चोराला डोंबिवली पोलिसांनी (Dombivali ) पकडले आहे.  हा भाजी विक्रेता घरफोड्या करून त्यातून आलेला पैसा बार मध्ये उडवत होता. विशेष म्हणजे, काही मित्रांच्या संगतीने लागलेल्या दारूची बाटली अन् बारबालांच्या नादात तो सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. अखेर मानपाडा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा शिताफीने तपास करून घरफोड्या करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक केली. बबन दशरथ जाधव (वय 39 रा. इगतपुरी ) असं या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आतापर्यंत त्याने चार घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून 6 लाख 75 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोदींच्या कृषी कायद्यांना देशभरातल्या 800 हून अधिक शैक्षणिक तज्ज्ञांनी दर्शवला आरोपी बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका खेड्यात आपल्या कुटुंबासह राहतो. टाळेबंदीच्या काळात बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी आदी परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून कल्याणच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येत होता. यामधून त्याची दररोज चार ते पाच हजार रुपयांची कमाई व्हायची. मात्र, काही मित्रांच्या नादी लागून तो डान्सबारमध्ये मद्यपान करण्यासाठी जाऊ लागला. हळूहळू त्याला दारूच्या बाटलीसह बारबालांचा चांगलाच नाद लागला. नंतर दोन-दोन दिवस कल्याणमध्येच मुक्काम ठोकून तिसऱ्या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतत होता. पत्नीला व्यवसाय झाला नसल्याचे सांगत महानगरपालिकेने सर्व भाजीपाला उचलून नेला, इत्यादी कारणे सांगून त्याने घरी पैसे देणे बंद केले. त्यामुळे घरी पत्नी आणि मुलांची उपासमार सुरू झाली. नंतर बारमध्ये उडवण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे अखेर त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. डोंबिवली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यास सुरुवात केली. मन हेलावून टाकणारी घटना, खेळता खेळता 3 वर्षांची चिमुरडी पडली 30 फूट खड्ड्यात! अखेर तो मानपाडा पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असून घरफोडीतील सर्व पैसा त्याने बाई आणि बाटलीवर उडवल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. आता मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इतर चार गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आणि त्याच्याकडून चार घरफोडीतील सहा लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहे.
Published by:sachin Salve
First published: