मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आईची हत्या केली नाही, मग तुकडे का केले? न्यायालयाच्या प्रश्नावर रिंपलने केला खुलासा

आईची हत्या केली नाही, मग तुकडे का केले? न्यायालयाच्या प्रश्नावर रिंपलने केला खुलासा

lalbaug crime

lalbaug crime

रिंपलने आईची हत्या आपण केली नाही असे न्यायालयात ठामपणे सांगितले. २७ डिसेंबर रोजी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली आणि तिला दोन मुलांनी उचलून खाली आणल्याचे रिंपल म्हणाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च : लालबागमध्ये आईच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या लेकीने न्यायालयात अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. तसंच आपण आईची हत्या केली नसल्याचा दावा करताना तिने आई पडल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाचे फक्त तुकडे केले असं न्यायालयात सांगितलं. वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणी रिंपल जैनला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. रिंपलला तिच्या आईची हत्या आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आणखी कुणी मदत केली का? याच्या तपासासाठी पोलिस कोठडी २४ तारखेपर्यंत वाढवण्यात आलीय.

वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी रिंपलला अटक केल्यानंतर ती पोलीस कोठडीत आहे. तिच्या पोलिस कोठडीत वाढ करावी यासाठी रिंपलला न्यायालयात हजर करण्यात आली होती. रिंपलने गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसंच जिथून तिने या वस्तू खरेदी केल्या तिथेही तपास करण्यात आला. रिंपलला या गुन्ह्यात आणखी कुणी मदत केली का? इतर कोणत्या शस्त्रांचा वापर केला का? यासाठी रिंपलच्या बोटांचे ठसे घ्यायचे बाकी असल्याचं सांगत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

रिंपलने आईची हत्या आपण केली नाही असे न्यायालयात ठामपणे सांगितले. २७ डिसेंबर रोजी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली आणि तिला दोन मुलांनी उचलून खाली आणल्याचे रिंपल म्हणाली.

आईचा पडून मृत्यू झाला मत मृतदेहाचे तुकडे का केले असा प्रश्न न्यायालयात विचारला असता रिंपल म्हणाली की, तिच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर येईल आणि माझे घर जाईल. आईचे मामाकडे असलेले बँकेतील पैसे मिळणार नाहीत या भीतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले असं रिंपलने सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Mumbai