मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कोयता गँगनंतर आता पुण्यात तलवाल गँगची दहशत; तरुणांकडून 14 वाहनांची तोडफोड

कोयता गँगनंतर आता पुण्यात तलवाल गँगची दहशत; तरुणांकडून 14 वाहनांची तोडफोड

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात तरुणांनी धुडगूस घालत तब्बल 14 वाहनांची तोडफोड केलीये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 24 मार्च :  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात तरुणांनी धुडगूस घालत तब्बल 14 वाहनांची तोडफोड केलीये. पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकरनगर परिसरातील ही घटना आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरात दहशत राहवी यासाठी 10 ते 12  तरुणांच्या टोळक्याकडून तलवारीने 14 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये रिक्षा, दुचाकी, टोम्पो, चारचाकी, अशा वाहनांचा समावेश आहे. कोयता गँगनंतर आता तलवार गँग सक्रिय झाली आहे का? असा सवा या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.

रात्रीच्या सुमारास तोडफोड  

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री  4 दुचाकींवर 10 ते 12 जण कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगरमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 6 चारचाकी, 3 दुचाकी, 3 टेम्पो, 1 रिक्षा, 1 छोटा टेम्पो अशा एकूण 14 वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

मित्राबरोबर जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत भयानक कांड; पालघर हादरलं

दहशत रहावी म्हणून तोडफोड  

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपींना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. हृषिकेश गोरे (20), सुशील दळवी (20), प्रवीण भोसले (18) असे  अटक केलेल्या आरोपींची नाव असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune, Pune crime