Home /News /crime /

भयंकर! वहिनीने रागाने दीराचा प्रायव्हेट पार्टचं कापला अन् स्वत:च्याच मनगटावर केले वार

भयंकर! वहिनीने रागाने दीराचा प्रायव्हेट पार्टचं कापला अन् स्वत:च्याच मनगटावर केले वार

महिला पती आणि दीरासोबत एकाच घरात राहत होती. त्या दिवशी नेमकं असं काही तरी झालं की,...

    कानपुर, 28 जानेवारी : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीदरम्यान कानपुरच्या (UP Crime News) बिल्होरमधून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. बिल्होर पोलीस ठाणे हद्दातील बदल नवादा गावात खळबळ उडाली आहे. येथे घरगुती वादातून दीर आणि वहिनीमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. यादरम्यान सर्वत्र रक्त सांडलं होतं. यानंतर जखमी दीरावर उपचारासाठी तत्काळ स्थानिक आरोग्य केंद्रात पाठवण्याच आलं होतं. मात्र त्याची प्रकृती पाहून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, वहिनी आणि दीरामध्ये मारहाण झाली. यात वहिनीने आपल्या दीराचा प्रायवेट पार्टवर (Private Part) धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर दीर गंभीर जखमी झाला. यादरम्यान सर्वत्र रक्त सांडलं होतं. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दीरावर हल्ला केल्यानंतर महिलेने चाकूने आपल्या हाताची नस कापली. तिलादेखील कुटुंबीयांनी रुग्णालयात भरती केलं आहे. अद्याप या प्रकरणात कोणाही विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. हे ही वाचा-आधी Rape, मग अश्लील व्हिडीओ; 3 मित्रांसोबत शेअर केल्यानंतर थरकाप उडवणारा प्रकार काय आहे संपूर्ण प्रकरण? ही घटना बिल्होर पोलीस ठाणेतील नवादा गावातील आहे. रुबीना पती जानूसोबत राहते आणि तिचा दीर सोनूदेखील सोबत राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, रुबीनाचे दीरासोबत अवैध संबंध आहेत. तिचा पती दिव्यांग असून मतीमंद आहे. त्यादिवशी वहिनी आणि दीरामध्ये कोणा एका गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर महिलेने धारदार शस्त्राने दीराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. यादरम्यान दीर सोनू गंभीर जखमी झाला. यानंतर महिलेनेही आपल्या हाताची नस कापली. या प्रकरणात बिल्होर पोलिसांनी सांगितलं की, दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तक्रार केल्यानंतर कारवाई सुरू करण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, PRIVATE part, Uttar pradesh news

    पुढील बातम्या