Home /News /crime /

भयंकर! सुटकेसमध्ये धड तर पिशवीत शीर, बंद कारखान्याबाहेर हत्येचा थरार

भयंकर! सुटकेसमध्ये धड तर पिशवीत शीर, बंद कारखान्याबाहेर हत्येचा थरार

पोलिसांना तपासादरम्यान सूटकेसजवळ एक सूट आणि चादरही मिळाली आहे.

    बाराबंकी, 08 जुलै: बंद पडलेल्या कारखान्याजवळ सूटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. या सूटकेसमध्ये नग्न महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते. सूटकेसमध्ये शरीराचे तुकडे तर प्लॅस्टिकच्या बॅगेत मुंडक ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान सूटकेसजवळ एक सूट आणि चादरही मिळाली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेची आधी हत्या झाली असावी आणि त्यानंतर अज्ञाताने मृतदेहाचे तुकडे या सूटकेसमध्ये भरून सूनसान ठिकाणी टाकले असावेत. मृतदेह सडायला सुरुवात झाल्याचंही पोलिसांनी यावेळी सांगितलं. या महिलेचं लैंगिक शोषण केलं असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हे वाचा-महिलांमध्ये 10 रुपयांच्या ‘भेळ’साठी भांडण, नंतर घरात घडला धक्कादायक प्रकार ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरातील सफेदाबाद इथे घडली आहे. पोलिसांच्या तपासात काही अंतरावर एक कॅरी बॅग आढळली. पोलिसांनी पिशवी उघडली त्यामध्ये महिलेच्या हाता-पायाचे तुकडे कापून टाकलेले होते. या प्रकरणी सध्या पोलिसांना तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Up Police, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या