मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Uttar Pradesh Prayagraj : प्रयागराजमध्ये घरात घुसून वयोवृद्ध दाम्पत्याचा खून; एका आरोपीला पकडलं, दोन साथीदारांचा मृत्यू

Uttar Pradesh Prayagraj : प्रयागराजमध्ये घरात घुसून वयोवृद्ध दाम्पत्याचा खून; एका आरोपीला पकडलं, दोन साथीदारांचा मृत्यू

प्रयागराजमध्ये घरात घुसून वयोवृद्ध दाम्पत्याचा खून; एका आरोपीला पकडलं, दोन साथीदारांचा मृत्यू

प्रयागराजमध्ये घरात घुसून वयोवृद्ध दाम्पत्याचा खून; एका आरोपीला पकडलं, दोन साथीदारांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये (Uttar Pradesh Prayagraj) काही दिवसांपूर्वी एका दांपत्याची हत्या झाली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला.

प्रयागराज 11 ऑगस्ट : उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये (Uttar Pradesh Prayagraj) काही दिवसांपूर्वी एका दांपत्याची हत्या झाली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणातल्या एकाला अटक झाली; पण दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण कळलेलं नाही. लवकुश पासी असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

प्रेमप्रकाश मिश्रा व त्यांची पत्नी हे दाम्पत्य प्रयागराजमधल्या सोरांव इथल्या दादूपूर परिसरात राहत होते. 1 ऑगस्ट रोजी रात्री कौशांबी येथील रहिवासी लवकुश पासी व त्याचे दोन साथीदार चोरीच्या उद्देशाने घराच्या छतातून आतमध्ये घुसले. घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांनी चोरी करण्यासाठी चाचपणी सुरू केली. त्याच वेळी आवाज झाला आणि दाम्पत्याला जाग आली. घरात चोर घुसल्याचं लक्षात येताच दाम्पत्याने आरडाओरडा करून चोरट्यांचा विरोध सुरू केला. चोरट्यांनी रागाच्या भरात लोखंडी रॉडने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यात वयोवृद्ध शिक्षक प्रेमप्रकाश मिश्रा यांचा मृत्यू झाला, तर नीरजा मिश्रा गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं; पण उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योतही मालवली.

हे ही वाचा : 'दुल्हन हम ले जायेंगे' म्हणत आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात आले अन् 390 कोटी शोधून काढले

चोरीच्या उद्देशाने मिश्रा यांच्या घरात घुसलेल्या तिघांनी दाम्पत्यावर हल्ला करून पळ काढला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. या हत्याकांडात 3 आरोपींचा समावेश असल्याचं पोलिस तपासात समोर आले. त्यांनी सर्वांचा माग काढून लवकुश पासी या आरोपीला अटक केली. परंतु, त्याच्या इतर दोन साथीदारांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यांच्या मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

सीसीटीव्ही फुटेज आणि चोरीच्या मोबाइलवरून काढला माग

दाम्पत्याचं हत्याकांड घडल्यानंतर प्रयागराज पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान होतं. हत्या झाली त्या घराच्या परिसरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. तसंच चोरट्याने एका ठिकाणाहून मोबाइल लंपास केला होता. त्या मोबाइलचं लोकेशन ट्रेस करून त्याचा माग काढण्यात आला. इतर दोन आरोपींच्या मृत्यूचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.

घटनास्थळापासून काही अंतरावर कपड्यांवरचे डाग धुतले

मिश्रा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तिन्ही चोरट्यांनी घटनास्थळाजवळच्या एका हँडपंपवर कपडे आणि शरीरावर लागलेले रक्ताचे डाग धुऊन स्वच्छ केले. त्यानंतर ते सिव्हिल लाइन्समार्गे कौशांबीला पोहोचले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एका घरातून मोबाइलही चोरला होता.

First published:

Tags: Crime news, Up crime news, Uttar pardesh, Uttar pradesh news