Home /News /crime /

घृणास्पद! 5 वर्षांच्या बहिणीवर 6 महिन्यांपर्यंत वारंवार केला बलात्कार, कोर्टाने सुनावली थरकाप उडवणारी शिक्षा

घृणास्पद! 5 वर्षांच्या बहिणीवर 6 महिन्यांपर्यंत वारंवार केला बलात्कार, कोर्टाने सुनावली थरकाप उडवणारी शिक्षा

2 मुलांचा बाप असलेला 32 वर्षांचा हा भाऊ आपल्या 5 वर्षांच्या बहिणीवर वारंवार बलात्कार करीत होता.

    उत्तराखंड, 25 सप्टेंबर : उत्तराखंडमधील (Uttarakhand News) सीमांत जिल्ह्यातील पिथोरागडमध्ये शुक्रवारी जिल्हा फास्ट ट्रॅक कोर्टाने 5 वर्षांच्या मुलावर 6 महिन्यांपर्यंत लैंगिक अत्याचार (Rape on Minor in Uttarakhand) करणाऱ्या सावत्र भावाला फाशीची (death penalty) शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने पीडितेला 7 लाखांची नुकसान भरपाई देण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एप्रिलमध्ये मूळचा नेपाळ (Nepal) असलेला जनक बहादूर आपल्या दोन अल्पवयीन मुलं आणि 5 वर्षांच्या सावत्र बहिणीसह जाजरदेवल भागात राहायला आला होता. अल्पवयीन मुलांनी सांगितलं की, तब्बल 32 वर्षांचा जनक आपल्या सावत्र बहिणीला अनेकदा मारहाण करीत असे. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तपासाअंती आरोपी जनकला अटक केली. त्याशिवाय त्याचे दोन मुलं आणि पीडितेलाही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. 4 एप्रिल रोजी मुलीला एका संस्थेकडे सोपवण्यात आलं. यानंतर पीडितेने संस्थेच्या सदस्यांना तिच्यासोबत झालेल्या दृष्कृत्याबाबत माहिती दिली. (5-year-old sister repeatedly raped for 6 months, shocking sentence handed down by court) हे ही वाचा-डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्. पीडित मुलीने सांगितलं की, तिच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. ती सावत्र भाऊ जनक बहादूर याच्यासोबत राहत होती. गेल्या 6 महिन्यांपासून जनक तिच्यावर अत्याचार करीत होता. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा दिसल्या. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य पाहता आरोपीवर पॉक्सो आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला. यावेळी आरोपीच्या मुलांनीही घडलेला प्रकार न्यायालयात सांगितलं. कोर्टात या प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी जनक बहादूर याला दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली. सावत्र भाऊ जे कृत्य करीत होता, ते क्षमा करण्यायोग्य नसल्याचंही कोर्टाने सांगितलं. न्यायालयाने पीडित  मुलीचं भविष्य पाहता नुकसानभरपाई म्हणून आरोपीला 7 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या