भावाने घेतला सख्ख्या भावाचा बदला, पत्नीसोबत अवैध संबंध ठेवल्यानं काढला काटा

भावाने घेतला सख्ख्या भावाचा बदला, पत्नीसोबत अवैध संबंध ठेवल्यानं काढला काटा

सख्खा भाऊ झाला वैरी! पत्नीसोबत अवैध संबंध ठेवणाऱ्या भावाचा काढला काटा

  • Share this:

वाराणसी, 31 ऑक्टोबर : सख्खा भाऊ पक्का वैरी झाला आणि त्यानं संसार उद्ध्वस्त केला. पत्नीला फुस लावून तिच्याशी अवैध संबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून तरुणानं आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिक असणाऱ्या व्यक्तीच्या मुलाची राकेश रोशन हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. ही हत्या राकेशच्या धाकट्या भावानेच केली असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 28 ऑगस्टला राकेशची गोळी घालून हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर हत्येनंतर त्याच्या धाटक्या भावाने मृतदेहाची ओऴख पटवण्यासही नकार दिला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यानंतर या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यत आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. त्याने या गुन्ह्याची कबुली चौकशीदरम्यान दिली आहे. सध्या तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

हे वाचा- फटाका स्टीलच्या ग्लासमध्ये घालून फोडला; 9 वर्षाच्या मुलाच्या शरीराच्या चिंधड्या

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान आशुतोष यादवनं धक्कादायक खुलासा केला आहे. पत्नीसोबत अवैध संबंध ठेवल्याच्या रागातून मुकेशने मोठा भाऊ राकेशला गोळ्या घातल्या. अटक केलेला आरोपी मुकेश एका खून प्रकरणात 2017 मध्ये तुरूंगात गेला होता आणि जानेवारी 2020 मध्ये जामिनावर बाहेर आला. मुकेशच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान मोठा भाऊ राकेशचे आपल्या पत्नीबरोबर अवैध संबंध होता.

मुकेशनं राकेश आणि आपल्या पत्नीला एके दिवशी अवैध रंगेहाथ पकडलं आणि त्याची पायाखालची जमीनच सरकली. तुरूंगात वास्तव्यास असताना मुकेशची आशुतोष उर्फ ​​चित्कू याच्याशी मैत्री झाली होती. दोघेही सहा महिने एकाच तुरूंगात होते. अशा परिस्थितीत मुकेशने आशुतोष आणि रामानंद यांच्यासह मोठ्या भावाला मारून लपवण्याचा कट रचला.

आशुतोष आणि रामानंद यांनी राकेशला दारू पिण्यासाठी घराबाहेर आणलं. तिथे मुकेशही पोहोचला. पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या रागातून मुकेशनं मोठा भाऊ राकेशवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाला. या हत्याकांडानंतर 24 तासांपर्यंत मृतदेहाची ओळख पटली जाऊ शकली नाही. इतकेच नाही तर मुख्य मारेकरी मुकेशनेही मृतदेहाची ओळख पटण्यास नकार दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात चंदौली पोलिसांना आता यश आलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील सिवान परिसरात घडली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 31, 2020, 12:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या