धक्कादायक! जेवण तयार झालं नाही म्हणून पतीनं चाकूने केले सपासप वार

धक्कादायक! जेवण तयार झालं नाही म्हणून पतीनं चाकूने केले सपासप वार

पोलिसांनी घटनास्थळी दाखळ होत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केलं आहे. तर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 डिसेंबर : पत्नीला जेवण न करणं जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात जेवण केलं नाही म्हणून पतीनं धारदार शस्त्रानं गळ्यावर वार केले आहेत. पती त्यावेळी दारूच्या नशेत होता आणि पत्नीवर वार करून तो फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपी पतीला अटक केली आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित सिंह आपली पत्नी गीता सिंग यांच्यासह लखनऊमधील विभूटखंड भागातील बारा भरवारा येथे राहत होता. अमित सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. अमितला रोज दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे रोज रात्री घरी येताना तो दारू पिऊन यायचा.

हे वाचा-‘ख्रिसमस लाइटिंग’चं निमित्त, इलेक्ट्रीक शॉक देऊन केली बायकोची हत्या!

घटनेच्या संध्याकाळी अमित दारूच्या नशेत घरी आला. घरी पत्नीने जेवण केलं नाही यावरून दोघांमध्ये वाद चालू झाला. हा वाद टोकाला पोहोचला आणि संतापलेल्या पतीनं पत्नीवर धारदार शस्त्रानं वार करण्यास सुरुवात केली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळावरून पती फरार झाला तर आजूबाजूच्या व्यक्तींनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखळ होत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केलं आहे. तर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पीडित महिलेवर ट्रॉमा सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही धक्कादायक घटना लखनऊमधील विभूतिखंड परिसरात घडली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 28, 2020, 1:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या