कॉन्स्टेबल आईने विचारही नव्हता केला असं घडलं, प्रेमात वेड्या लेकीनेच जन्मदात्रीला संपवलं

कॉन्स्टेबल आईने विचारही नव्हता केला असं घडलं, प्रेमात वेड्या लेकीनेच जन्मदात्रीला संपवलं

व्हॅलेंटाईन डे दिवशी उत्तर प्रदेशमध्ये आई-लेकीच्या प्रेमाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली.

  • Share this:

गाझियाबाद, 15 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. जगभरात हा प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र उत्तर प्रदेशमध्ये याच दिवशी आई-लेकीच्या प्रेमाला काळीमा फासणारी एक घटना घडली. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. प्रेमात वेड्या असलेल्या मुलीने चक्क आपल्या आईची हत्या केली. या घटनेने गाझियाबाद हादरले आहे.

दिल्लीतील बृजविहार पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या हवालदार शशी शुक्ला यांच्या विरोधात त्यांच्या मुलीनेच खुनाचा कट रचला. शशी शुक्ला यांच्या अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकरासोबत आपल्या आईची निघृणपणे हत्या केली.

वाचा-हातोडा आणि लोखंडी हुकाने पत्नीवर केले 100 वार, मृतदेहावर बाळाला ठेऊन पती फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागचे कारण मुलीच्या प्रेमाला आईने केलेला विरोध ठरला. शशी शुक्ला यांना आपल्या मुलीचा प्रियकर पसंत नव्हता. त्यामुळं त्याला भेटण्यासाठी शशी यांनी मुलीला नकार दिला होता. याच रागातून प्रेमात वेड्या झालेल्या या लेकीनं आपल्या आईची हत्या केली. या हत्येनंतर पोलीसही धास्तावले आहेत.

वाचा-Valentine दिवशी पोलिसांनी 24 जोडप्यांना पकडलं, जेलमध्ये दिलं SEXवर लेक्चर

या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, पोलिसांना पहिली शंका मुलीवर आली. पोलिसांनी जेव्हा अल्पवयीन मुलीची काटेकोरपणे चौकशी केली तेव्हा तीने सत्य सांगितले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

वाचा-लेकाला अग्नी देणाऱ्या बापाने दिली होती ठार मारण्याची सुपारी!

असे सांगितले जात आहे की, महिला पोलीस आपल्या मुलीला प्रेयकराला भेटू देत नव्हती. यावरून त्यांच्यात कायम वाद होत होते. म्हणूनच आईचा काटा काढण्यासाठी शशी यांच्या मुलीने आपल्या प्रियकरासोबत प्लॅन आखला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Feb 15, 2020 03:16 PM IST

ताज्या बातम्या