महिलेची पर्स चोरण्याचं धाडस नडलं! 20 सेकंदात 12 वेळा चपलेनं केलेल्या धुलाईचा VIDEO VIRAL

महिलेची पर्स चोरण्याचं धाडस नडलं! 20 सेकंदात 12 वेळा चपलेनं केलेल्या धुलाईचा VIDEO VIRAL

पर्स चोरल्याच्या रागातून महिलेनं एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

शामली, 28 डिसेंबर : दोन दिवसांपूर्वी चोराला भररस्त्यात उलटं लटकवून बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा चोरी करणाऱ्या व्यक्तीला भर बाजारात शिक्षा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका महिलेनं कायदा हातात घेऊ भररस्त्यात चोराला एक दोन नाही तर 20 सेकंदात 12 वेळा चपलेनं बदडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील शामली इथला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता रस्त्यावरून जात असणाऱ्या महिलेची पर्स चोरल्याच्या रागातून महिला एका व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. मारहाण करणारा व्यक्ती चोर असून त्याने पर्स हिसकावल्याचा आरोप महिलेनं करत त्याला चपलांनी बेदम मारहाण केली आहे. लोकांनी या व्यक्तीला पकडलं आणि महिलेनं धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-धक्कादायक! जेवण तयार झालं नाही म्हणून पतीनं चाकूने केले सपासप वार

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली मात्र महिलेनं कायदा हाती घेऊन या चोराची धुलाई केली आहे. हा व्यक्ती पर्स चोरी करत असल्याचा आरोप महिलेनं केला.

या आधी दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीची एक घटना समोर आली होती. एका चोराला भररस्त्यात बांधून बेदम मारहाण केल्यानं त्याचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. चोरी केल्यानं नागरिकांच्या रोषाला जावं लागलं होतं. पोलिसांच्या हवाली करण्याऐवजी नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 28, 2020, 11:06 PM IST

ताज्या बातम्या