मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिला पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महात्या, खोलीत सापडली सुसाईड नोट

महिला पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महात्या, खोलीत सापडली सुसाईड नोट

महिला पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

बुलंदशहर, 02 जानेवारी : महिला पोलीस कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिला पोलीस कर्मचारीने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये यूपी पोलीस उपनिरीक्षक आरजू पवार यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. भाड्यानं घरात राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महिलेनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 7 वाजता जेवण काय आहे अशी विचारणा करून आरजू गेली ती पुन्हा परतलीच नाही. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी घरमालक त्यांच्या खोलीकडे पोहोचला तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत महिला पोलीस उपनिरीक्षक आरजू यांचा मृतदेह आढळून आला आहे.

हे वाचा-‘सर्व हिंदू देशभक्त, तर नथुराम गोडसे कोण होता?’,ओवैसींचा भागवतांना प्रश्न

आरजू पवार या 2015 बॅचच्या एसआय आहेत. त्या शामली इथल्या रहिवासी होत्या, त्यांच्या खोलीतून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी हे माझ्या कर्माचं फळ असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी घरातून दोन ओळींची सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे. त्यांनी आपल्या आत्महत्येबाबत कुणाला जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Uttar pardesh