खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करून दिली धमकी

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार करून दिली धमकी

आरोपींनी बलात्कार पीडितेचा व्हिडीओही तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पीडितेच्या कुटूंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

  • Share this:

सीतापूर, 15 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील सीतापुरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गावातीलच 5 तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी बलात्कार पीडितेचा व्हिडीओही तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पीडितेच्या कुटूंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पाचही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि एका आरोपीला अटक केली. ही घटना 7 सप्टेंबर रोजी घडली.

असा आरोप आहे की सीतापूरच्या इमलिया सुलतानपूर भागातील भांडिया गावात 7 सप्टेंबर रोजी दलित अल्पवयीन मुलगी शौचालयासाठी गेली असता गावातील पाच तरुणांनी पीडितीला पकडलं. त्यावंतर पीडितेला उसाच्या शेतात घेऊन गेले आणि त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती.

वाचा-मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार

मात्र, सोमवारी या आरोपींनी सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. तातडीने पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि आरोपींचा शोध सुरू केला.

वाचा-मानवतेला काळिमा, 10 रुपयांचं आमिष दाखवून 5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार

एकाला अटक

एसपी आरपी सिंह स्वत: सामूहिक बलात्कार घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी सुत्रं हातात घेतली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक पथकही तयार केले आहे. आतापर्यंत पाच पैकी एकाला अटक करण्यात आली आहे तर चार आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे एसपींनी सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: September 15, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या