मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकरासोबत घरात पाहिलं अन् घात झाला, सख्ख्या बहिणीकडून अल्पवयीन भावाची हत्या

प्रियकरासोबत घरात पाहिलं अन् घात झाला, सख्ख्या बहिणीकडून अल्पवयीन भावाची हत्या

 भावासाठी जीव ओवाळून टाळणाऱ्या बहिणीनं प्रेमासाठी धक्कादायक पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे.

भावासाठी जीव ओवाळून टाळणाऱ्या बहिणीनं प्रेमासाठी धक्कादायक पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे.

भावासाठी जीव ओवाळून टाळणाऱ्या बहिणीनं प्रेमासाठी धक्कादायक पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

प्रयागराज, 27 डिसेंबर : भावासाठी जीव ओवाळून टाळणाऱ्या बहिणीनं प्रेमासाठी धक्कादायक पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. प्रेमासाठी अडथळा ठरणाऱ्या आणि आपलं बिंग घरी फुटू नये म्हणून तरुणीनं आपल्या लहान भावाचा प्रियकराच्या मदतीनं कायमचा काटा काढला. या लहान भावाची चूक एवढीच होती की त्यानं आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत घरात एकत्र पाहिलं होतं. हे त्याच्या जीवावर बेतेल आणि त्याचा वाईट काळ बनून येईल याची पुसटशीदेखील त्याला कल्पना नव्हती.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या बडगोहना गावात सख्ख्या बहिणीनंच आपल्या धाकट्या 14 वर्षांच्या भावाचा जीव घेतला आहे. प्रियकरासोबत भेटल्यानं या भावानं घरी तोंड उघडू नये अशी भीती या तरुणीला वाटत होती म्हणून प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेतला आणि दोघंही फरार झाले. घरी जेव्हा आई-वडील आले तेव्हा त्यांना हा काय प्रकार आहे ते समजेना. मुलगा घरात पडलेल्या अवस्थेत होता. त्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली.

हे वाचा-अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट, पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

पोलिसांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला त्यावेळी या चिमुकल्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तरुणी पळून गेल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी तपासाची सूत्र त्या दिशेनं फिरवली. 19 वर्षीय तरुणीनं प्रियकराच्या मदतीनं भावाची हत्या केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

प्रियकरासोबत भावाने आपल्याला घरात पाहिलं होतं आणि घरच्यांना सांगेल या भीतीनं त्यांनी जीवे मारल्याची माहिती देखील पोलिसांनी यावेळी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून कारागृहात पाठवलं आहे.

First published:

Tags: Uttar pradesh