बिहार, 01 सप्टेंबर : पोलीस एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असेल आणि ती व्यक्ती जीवंत असेल असे प्रसंग सिनेमा किंवा सिरियल्समध्ये पाहायला मिळतात. मात्र बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. बलात्कार आणि खून प्रकरणात ज्या आरोपीला पोलीस शोध घेत होते, त्याच प्रकरणी मृत मुलीचाच व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसही हादरले.
काही दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यात एका तरुणीच्या घरच्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांना या मुलीचा मृतदेहही सापडला. त्यावेळी या मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी एफआयआर नोंदविला आणि मारेकरीचा शोध सुरू केला. मात्र ज्या मुलीचा शोध पोलीस घेत होते, तीचाच व्हिडीओ पोलिसांना सापडला. मुख्य म्हणजे या मुलीच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते.
वाचा-स्पर्धा परीक्षेत यश मिळालं मात्र जीवनात ठरला अपयशी; तरुणाची आत्महत्या
या मुलीने व्हिडीओमध्ये, मी माझ्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. माझ्या घरचे मुद्दाम खोटा गुन्हा दाखल करुन याला हत्येचं प्रकरण बनवलं आहे. एवढेच नाही तर तिच्य कुटुंबियांना तिने फोन करुनही जिवंत असल्याचे सांगितले तरी त्यांनी गुन्हा दाखल केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांसमोर नवीन गुंता तयार झाला आहे.
वाचा-पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, 7 महिन्यांनी घरी परतली
सध्या पोलिसांपुढे ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती कोण? असा प्रश्न समोर आला आहे. आता पुन्हा संपूर्ण प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच पोलिसांनी याचा नव्याने तपास सुरू केला आहे, अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता हे शोधणंही पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. तर, ज्या व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या कुटुंबियाविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई केली आहे.