स्पेलिंगमध्ये खाल्ली माती, आता मोज तुरुंगाच्या भिंती; अपहरणकर्त्याला पोलिसांनी शिताफीने पकडले

स्पेलिंगमध्ये खाल्ली माती, आता मोज तुरुंगाच्या भिंती; अपहरणकर्त्याला पोलिसांनी शिताफीने पकडले

चुकीच्या स्पेंलिंगच्या(Spelling Mistake) आधारावर पोलिसांनी अपहरणकर्त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

  • Share this:

बेनीगंज, 08 नोव्हेंबर: लहानपणी तुमच्या शाळेतले शिक्षक तुमच्याकडून इंग्रजीची स्पेलिंग पाठ करुन घ्यायचे का? तुम्ही तेव्हा अभ्यासाकडे नीट लक्ष दिलं होतं ना? आम्ही तुम्हाला हे सगळं विचारत आहोत कारण इंग्रजीतलं स्पेलिंग चुकीचं लिहील्यामुळे एक अपहरणकर्ता पोलिसांच्या हाती लागला आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई इथे राहणाऱ्या रामप्रताप सिंह या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलं आहे. रामप्रतापने आपल्याच 8 वर्षाच्या चुलत भावाचं अपहरण केलं. पैशांसाठी त्याने स्वत:च्याच भावासोबत अशी क्रूर थट्टा केली. 26 ऑक्टोबर रोजी आरोपीने आजीच्या घरातून मुलाचं अपहरण केलं आणि मुलाच्या वडिलांना धमकीचा मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये रामप्रतापने लिहिलं होतं, ‘Do lakh rupay Seeta-Pur lekar pahuchiye. Pulish ko nahi batana nahi to haatya kar denge.’  या मेसेजमध्ये रामप्रतापने सितापूर आणि पोलीस या शब्दांचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं होतं. मुलाच्या वडिलांनी घाबरुन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली नाही.

पोलिसांची चतुराई

अखेर 4 नोव्हेंबरला मुलाचा काहीच पत्ता लागत नाही म्हणून मुलाच्या कुटुंबाने पोलीस ठाणं गाठलं. बोनीगंज पोलिसांना मुलाच्या वडिलांनी आरोपीने पाठवलेला मेसेजही दाखवला. त्या मेसेजवरुन पोलिसांनी शक्कल लढवली. सीसीटीव्हीचा आधार घेत काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना, 'मैं पुलिस मे भरती होना चाहता हूं, मैं हरदोई सें सीतापूर दौडकर जा सक्ता हूं’ हे वाक्य इंग्रजीमध्ये लिहायला सांगितलं. संशयित आरोपींमध्ये पकडल्या गेलेल्या रामप्रतापने पुन्हा सितापूर आणि पोलीस ही दोन्ही स्पेलिंग चुकीची लिहिली. आता पोलिसांना रामप्रतापच्या 'प्रतापाचा' शोध लागला होता. पोलिसांनी बाकीच्या सगळ्यांना सोडून देत रामप्रतापला अटक केली. रामप्रतापकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेळेत पैसे न मिळाल्याने त्याने आपल्या भावाचा खून केला.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 8, 2020, 5:18 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या