Home /News /crime /

कोरोनाग्रस्त महिलेसाठी भररस्त्यात राडा; अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड, मारहाण करत महिलेला पळवलं

कोरोनाग्रस्त महिलेसाठी भररस्त्यात राडा; अ‍ॅम्ब्युलन्सची तोडफोड, मारहाण करत महिलेला पळवलं

कोरोना रुग्ण (corona positive patient) म्हटला की लोक त्याच्यापासून लांब राहतात, मात्र इथं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला चक्क पळवून नेलं आहे.

    लखनौ, 19 ऑक्टोबर : कोरोना रुग्णांनी (corona patient) रुग्णालयातून पळ काढल्याच्या घटना आतापर्यंत तुम्ही ऐकल्या आहेत. मात्र एखाद्या कोरोना रुग्णालाच कुणीतरी पळवून नेणं, म्हणजे आश्चर्यकारकच आहे. जिथं अजूनही कोरोना रुग्ण म्हटला की लोक त्याच्यापासून लांब राहतात. अगदी घरातील सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह (corona positve) रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला स्वीकारण्यास घाबरतात. असं असताना उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी भररस्त्यात राडा घालण्यात आला आहे आणि त्या रुग्णाला पळवून नेलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फनगरमध्ये ही घटना घडली आहे. 108 क्रमांकांच्या अ‍ॅम्बुलन्समधून (Ambulance) एका कोरोनाग्रस्त महिलेला (Corona Patient) जिल्हा रुग्णालयातून बेगराजपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेलं जात होतं. त्यावेळी रस्त्यात तीन बाईकस्वार आले. या बाईकस्वारांनी अ‍ॅम्ब्युलन्स रोखली. अ‍ॅम्ब्युलन्सची त्यांनी तोडफोड केली, अ‍ॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि यानंतर कोरोना संक्रमित महिलेला आपल्यासह घेऊन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अ‍ॅम्ब्युलन्स चालकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. हे वाचा - भारतीय वंशाच्या 14 वर्षीय मुलीनं शोधला कोरोनावर उपाय, जिंकले 18 लाख पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेला अ‍ॅम्ब्युलन्समधून मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यासाठी नेलं जात होतं. त्यावेळी रस्त्यात तीन जणांनी अ‍ॅम्ब्युलन्स रोखली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेला आपल्यासोबत घेऊन ते फरार झाले. हे वाचा - राज्यातील कोरोना रिकव्हरी रेटमुळे दिलासा; पण नव्या संशोधनानं पुन्हा वाढली चिंता या आरोपींनी असं का केलं यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र कोरोना पॉझिटिव्ह महिलेलाच त्यांनी पळवून नेल्यानं आता संक्रमण अधिक पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Crime, Uttar pardesh

    पुढील बातम्या