Home /News /crime /

धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी दिला नाही मोबाईल; मुलाने चिरला वडिलांचा गळा आणि...

धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी दिला नाही मोबाईल; मुलाने चिरला वडिलांचा गळा आणि...

पब्जीसारख्या (pubg) मोबाईल गेमच्या (mobile game) नादात तीन दिवसातच अशी दुसरी धक्कदायक घटना समोर आली आहे.

    निखिल अग्रवाल/मेरठ, ऑक्टोबर : मोबाईलचं (mobile) व्यसन मुलांना इतकं जडलं आहे की मुलं घरच्यांच्या जीवावर उठली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना स्वत:च्या जीवाचीही काळजी राहिली नाही आहे. उत्तर प्रदेशात तीन दिवसातच अशी दुसरी घटना समोर आली आहे. PUBG खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने वडिलांचा गळा चिरला. त्यानंतर स्वतःत्या गळ्यावरही सुरा फिरवला आहे. दोघांचीही प्रकृती आता गंभीर आहे.  मेरठमध्ये (Meerut) ही धक्कादायक घटना घडली आहे. जमुना नगरच्या एवन कॉलनीत राहणारा 25 वर्षीय आमिरला पब्जी गेमचं व्यसन जडलं होतं. त्याने आपले वडील इरफान यांच्याकडे पब्जी खेळण्यासाछी मोबाइल मागितला. मात्र इरफान यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर आमिर संतापला. तो रागारागात आपल्या खोली गेला आणि तिथून हातात सुरा घेऊन बाहेर आला. आधी त्याने आपल्या वडीलांचा गळा चिरला, त्यानंतर पायावरही सुऱ्याने वार केले. इथंच तो थांबला नाही तर त्याने आपल्याम गळ्यावरही चाकू फिरवला. हे वाचा - नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीचा ओठ दाताने तोडला, औरंगाबादेतील संतापजनक घटना दोघंही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडले होते. बापलेक दोघंही मोठ्याने जीव वाचवण्यासाठी ओरडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक धावत आले.  दोघांनीही एमसीसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे, मात्र आमिरची प्रकृती खूप नाजूक असल्याचं सांगितलं जातं आहे. 13 ऑक्टोबरलादेखील पल्लवपुरम क्षेत्रात मोबाइल गेमवरून बहिणीसोबत वाद झाल्याने 11 वर्षीय मुलाने गळफास लावून घेतला. सुदैवाने तो बचावला आहे. तो आता हरा आहे.  त्याचे वडील मेडिकल स्टोअरवर होते आणि आई भाजी आणायला बाजारात गेली होती. आई-वडील दोघंही घरात नसताना बहीण-भावामध्ये मोबाइलवर गेम खेळण्यावरून भांडण झालं होतं. हे वाचा - नागपुरात मायलेकीचा मृतदेह आढळला, व्यक्त केला जातोय वेगळाच संशय केंद्र सरकारने चिनी पब्जी अॅपला प्ले स्टोरमधून हटवलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही वेबसाईटवर हा गेम उपलब्ध आहे, जिथून डाऊनलोड करून खेळला जातो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Crime news, Mobile, PUBG, Pubg game, Uttar pradesh

    पुढील बातम्या