लग्नासाठी नकार दिल्यानं डॉ. तरुणीची निर्घृण हत्या, रिकाम्या खोलीत सापडला मृतदेह

लग्नासाठी नकार दिल्यानं डॉ. तरुणीची निर्घृण हत्या, रिकाम्या खोलीत सापडला मृतदेह

योगितासोबत लग्न करण्यासाठी विवेकने तगादा लावला होता. योगिताला मात्र त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते.

  • Share this:

आगरा, 20 ऑगस्ट : सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधील MBBS पास झालेल्या तरुण डॉक्टर महिलेचा दोन दिवसांपासून पत्ता नव्हता. याची माहिती तिच्या भावानं पोलिसांना दिली. त्यानंतर बुधवारी या तरुणीचा मृतदेह शहरापासून दूर काही किलोमीटर अंतरावर एका रिकाम्या प्लॅटमध्ये सापडला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. योगिता गौतम असं मृत डॉक्टर तरुणीचं नाव. तिच्याच महाविद्यालयातील एक सिनियर डॉक्टर तिला छळत असल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी योगिताचा सिनियर असलेला संशयित आरोपी डॉ विवेक तिवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. डॉ. मोहिंदरकुमार गौतम यांनी या बहिणीच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यांनी सांगितले की त्यांच्या बहिणीने 2009 मध्ये मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा तिची ओळख डॉ.विवेक तिवारीसोबत झाली.

हे वाचा-...तर सीबीआयने किती आरोपी पकडले? शिवसेनेचा थेट सवाल

डॉ. विवेक तिवारी योगिताहून एक वर्ष सिनियर आहे. मंगळवारी डॉ.विवेक तिवारीने योगिताला जबरदस्तीने गाडीत खेचत नेलं. त्याचे काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत. योगितासोबत लग्न करण्यासाठी विवेकने तगादा लावला होता. योगिताला मात्र त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते. याचा राग डोक्यात घेऊन त्यानं योगिताची डिग्री रद्द करण्याची धमकीही दिली होती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी डॉ. विवेक तिवारीला पोलिसांनी अपहर आणि हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 20, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या