Home /News /crime /

‘बघ मी आत्महत्या करतोय’, माहेरी गेलेल्या पत्नीच्या रागात पतीने फेसबुक LIVE करत संपवलं जीवन

‘बघ मी आत्महत्या करतोय’, माहेरी गेलेल्या पत्नीच्या रागात पतीने फेसबुक LIVE करत संपवलं जीवन

पत्नी माहेर गेली म्हणून पतीने रागात फेसबुकवर दाखवला आत्महत्येचा डेमो.

    बरेली, 13 फेब्रुवारी : संसार म्हंटल की पती-पत्नीमध्ये भांडण आलंच. मात्र कधी कधी अशीच भांडण एवढ्या टोकाला जातात की लोकं आपले जीवन संपवण्यासही मागे पुढे पाहत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथे घडली. पती-पत्नीचा वाद एवढा टोकाला गेला की पतीने फेसबुल लाईव्ह करत आत्महत्या केली. वाचा-मुंबईतल्या अंधेरीत रोल्टा कंपनीली भीषण आग, फायरब्रिगेडच्या 19 गाड्या घटनास्थळी वाचा-नवऱ्याचे अश्लिल VIDEO पाहिल्याचा राग, त्याने बायकोलाच पेट्रोल टाकून जाळलं बरेली येथे मंगळावारी रात्री शिवम सिंह तोमर उर्फ अंकित यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीनं फेसबुकवर लाइव्ह केले होते. गेल्या काही दिवसांपासून अंकितचे पत्नी जूहीसोबत वाद सुरू होते. अंकितच्या आत्महत्येआधीच या दोघांचे कडाक्याचे भांडणही झाले होते. भांडणानंतर जूही कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. या रागात शिवमने तिला फोन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून काहीही उत्तर आले नाही, याचा राग मनात ठेवत त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. वाचा-भरधाव वेगात चालवत होते बाईक, मेट्रोच्या खांबाला आदळून जिवलग मित्रांचा मृत्यू वाचा-विवाहबाह्य संबंधांचा संशय, हिलस्टेशनवर नेऊन निघृणपणे केली अभिनेत्रीची हत्या शिवमने आपल्या एसडीएम कॉलनीतील राहत्या घरी आत्महत्येची तयारी करत असल्याचे फेसबुकवर लाइव्ह दाखवले. त्यानंतर शिवमनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या सगळ्या घटनेची तक्रार बरेली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय दंडविधान 306नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या