Home /News /crime /

खळबळजनक! भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या

खळबळजनक! भर ग्रामसभेत तरुणीने सरपंचांच्या पतीला घातल्या गोळ्या

'खूप त्रास द्यायचा, मारून टाकलं', अशी कबुली तिने पोलिसांकडे दिली आहे. एखाद्या वेब सीरिजमध्ये किंवा रक्तरंजित सिनेमातला वाटावा असा प्रसंग एका गावात प्रत्यक्ष घडला आहे.

कनौज (उत्तर प्रदेश), 23 मार्च: कुठल्याशा सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये पाहिला असावा असा नाट्यमय रक्तरंजित प्रसंग एका गावच्या पंचायतीत खराखुरा घडला. गावच्या महिला सरपंचाच्या पतीची भर पंचायतीसमोर एका तरुणीने गोळी घालून हत्या केली. "सरपंचाचा पती वाईट नजर ठेवून होता. छळवणूक करायचा, म्हणून मारून टाकलं", असा धक्कादायक कबुलीजबाब तरुणीने दिला आहे. उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) कन्नौजमधल्या (Kannauj) हीरापुरवा ग्रामपंचायतीत हा प्रकार रविवारी घडला. लाइव्ह हिंदुस्तानच्या बातमीनुसार ही तरुणी गावठी पिस्तुलीतून गोळी मारून फरार झाली. तिच्यासह पाच आरोपींना पोलिसांनी पकडलं तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. महिला सरपंचाच्या पतीची भर सभेत एका तरुणीने गोळ्या घालून (Shoot) हत्या केल्याने संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजत आहे.  बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं चौकशीत उघड झालं आहे. रामश्री (Ramashri) असं गावच्या सरपंचांचं नाव असून, त्यांचा नवरा रामशरणची (Ramsharan) हत्या सीमा नावाच्या युवतीने केली. सीमाने आपल्या काही मित्रांसह डाव रचला आणि भर सभेत त्रास देणाऱ्या रामशरणला गोळी घातली. श्यामबिहारी आणि त्याचा भाऊ हेमचंद्र हे दोन फरारी आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबातून असं स्पष्ट झालं, की गावातल्या संतराम नावाच्या व्यक्तीची मुलगी सीमा हिने गोळी झाडून रामशरणची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी सीमाला अटक केली. ती तिच्या घरातच सापडली. रामशरणकडून होत असलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. तो आपल्याला  आणि आपल्या धाकट्या बहिणीलाही त्रास द्यायचा. त्याचे हेतू वाईट होते आणि लैंगिक छळवणूक करायचा, असं सीमाचं म्हणणं आहे. मांत्रिक बाबाने स्वप्नात वारंवार बलात्कार केला; महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस शॉक दरम्यान, रामशरण यांचा मुलगा दीपक याने दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलं होतं, की एका वादावर तोडगा काढण्यासाठी त्याच्या वडिलांना पंचायतीत बोलावण्यात आलं होतं. त्याच वेळी विरोधातल्या व्यक्तींनी त्यांच्यावर गोळी झाडली, असा आरोप त्यात करण्यात आला होता. दरम्यान, आरोपींच्या चौकशीतून अनेक गोष्टी पुढे आल्या. संबंधित युवतीचं आरोपी श्यामबिहारीवर प्रेम होतं; मात्र त्यांच्या प्रेमावर रामशरणचा आक्षेप होता. तो त्यांच्यावर चिडायचा. त्यातूनच श्यामबिहारीने त्याच्या हत्येचा कट रचला आणि सीमा गोळी झाडायला तयार झाली. त्यासाठी नियोजन करून सभा बोलावण्यात आली. त्यात रामशरणलाही बोलावण्यात आलं आणि संधी साधून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हत्यारं पुरवणाऱ्या आणखी तिघांची नावं तपासादरम्यान पुढे आली. त्यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, अजून पाच जणांचा तपास सुरू आहे. हत्यारं पुरवणाऱ्यांचाही रामशरणवर जुना राग होता. म्हणून त्यांनी या कटात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, श्यामबिहारीचं सीमावर प्रेम असलं, तरी त्याचं लग्न बक्षीपूर्वा गावातल्या एका तरुणीशी ठरलं होतं. 24 जूनला हे लग्न होणार होतं; मात्र तत्पूर्वीच हा गुन्हा घडला आणि तो तुरुंगात गेला.
First published:

Tags: Up crime news, Uttar pradesh

पुढील बातम्या