• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नात्याला काळीमा फासणारा प्रकार; दारूच्या नशेत तरुणाने पत्नीला केलं मित्रांच्या स्वाधीन, त्यांनीही...

नात्याला काळीमा फासणारा प्रकार; दारूच्या नशेत तरुणाने पत्नीला केलं मित्रांच्या स्वाधीन, त्यांनीही...

या प्रकारानंतर महिलेला जबर धक्का बसला आहे..

 • Share this:
  लखनऊ, 10 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नोजमध्ये (Kannauj Crime News) नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पतीने पत्नीला शिक्षा दिली. दारूड्या पतीने (Drunk Husband) एका पार्टीमध्ये आपल्याच पत्नीला मित्रांच्या हवाली केलं. जेव्हा पतीच्या मित्रांनी महिलेसोबत जबरदस्ती आणि अश्लील व्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महिलेने आपल्या भावाला फोन केला. हे ऐकता महिलेची माहेरील मंडळी तातडीने तेथे हजर झाले. हैराण करणारी गोष्ट म्हणजे महिलेच्या कुटुंबासोबतही मारहाण करण्यात आली. बरेच प्रयत्न केल्यानंतर कुटुंबीय आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले. पीडित कुटुंबाने जावई आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल (Case Against Husband) केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. त्याशिवाय पोलीस आरोपी आणि त्याच्या मित्रांचा तपास करीत आहे. हे ही वाचा-रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीचा नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं! दारूड्या पतीने पत्नीला मित्रांकडे सोपवलं... पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती नेहमी दारू पिऊन तिला मारहाण करतो. लग्नात हुंडा न मिळाल्याने पती तिला नेहमी त्रास देतो आणि मारहाण करतो, असा महिलेने आरोप केला आहे. त्यादिवशी महिलेच्या पतीने दारूच्या नशेत तिला मित्रांच्या हवाली केलं. यावेळी त्याच्या मित्रांनी अश्लील कृत्य केल्याचंही महिलेने यावेळी पोलिसांना सांगितलं. ज्यानंतर तिने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतलं. हुंडा कमी मिळाल्याने पती रागावला होता... पोलिसांकडे तक्रार करीत महिलेने सांगितलं की, तिचं कुटुंब वाचविण्यासाठी तिथं पोहोचले तर त्यांनाही मारहाण करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर पतीच्या मित्रांच्या तावडीतून महिलेची सुटका झाली. यानंतर शनिवारी सायंकाळी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली आणि हा सर्व प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस तिचा पती आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत आहेत.

  Published by:Meenal Gangurde
  First published: