पत्नीला प्रियकरासोबत रूमवर रंगेहात पकडलं, पतीनं 1 मिनिटात 31 वेळा चपलेनं केली धुलाई, पाहा VIDEO

पत्नीला प्रियकरासोबत रूमवर रंगेहात पकडलं, पतीनं 1 मिनिटात 31 वेळा चपलेनं केली धुलाई, पाहा VIDEO

पत्नीचे अवैध संबंध असल्याचा पतीला अनेक दिवसांपासून संशय होता.

  • Share this:

आग्रा, 10 सप्टेंबर : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पतीनं रंगेहात पकडलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. प्रियकरासोबत हॉटेवर आलेल्या पत्नीला पतीनं पकडल्यानं मोठी खळबळ उडाली. पतीनं या दोघांना कानशिलात लगावली असून बेदम मारहाण केली. 1 मिनिटात तब्बल 31 वेळा चपलेनं धुलाई केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उत्तर प्रदेशातील ताज नगरी आग्रा इथे हा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा पतीला अनेक दिवसांपासून संशय होता. हे शोधून काढण्यासाठी पतीनं आपल्या पत्नीवर पाळत ठेवली आणि पत्नीला तिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहात पकडलं.

हे वाचा-लग्नादिवशीच दिसला वधूचा ब्रुस ली अवतार! रिसेप्शन पार्टी सोडून घातला राडा

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सुरुवातीला पतीनं कानशिलात लगावली आणि त्यानंतर चपलेनं मारहाण केली आहे. आपल्या पतीला थांबवण्याचा या महिलेनं खूप प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. पतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार केला असून व्हायरल केल्याचा दावा केला जात आहे.

हे वाचा-झेंडा लावला म्हणून पेटला वाद, पोलिसांची कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण, VIDEO

पतीला पत्नी आणि प्रियकर हॉटेलवर गेल्याची टीप मिळाली त्यानंतर त्यानं दोघांना रंगेहात पकडण्यासाठी पाठलाग केला आणि हॉटेलवर पोहोचला. सुरुवातीला हॉटेलमध्ये त्याला सोडत नव्हते मात्र तरीही तो घुसला आणि रुममध्ये जाऊन पाहिलं तर पत्नी आणि प्रियकर नको त्या अवस्थेत दिसले. याचा राग डोक्यात ठेवून पतीनं मारहाण करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 10, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading