कानपूर, 01 ऑगस्ट: आपल्या घरात बऱ्याचदा लहान मुलांना नोकर अथवा घरकाम करणाऱ्या बायकांवर लहान मुलांची जबाबदारी सोपवून आपण निर्धास्तपणे बाहेर जातो पण सावधानता बाळगायला हवी. कानपूरमधील कल्याणपूर पोलिस स्टेशन परिसरातील इंदिरा नगर येथील रतन ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेनं लहान मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
3 वर्षांच्या लहान मुलाला घरकाम करणाऱ्या महिलेनं अमानुषपणे मारहाण केली आहे. आई-वडील घर परतल्यानंतर लहान मुलागा खूप घाबरला होता. त्याची अवस्था पाहून आई-वडीललांना समजेना. घाबरलेला मुलगा घरकाम करणाऱ्या महिलेकडे पाहून घाबरून रडायला लागला. महिलेनं या चिमुकल्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रतन ऑर्बिट अपार्टमेंट निवासी सौरभ मानसिंह रेल्वेमध्ये उप-कार्यालय अधीक्षख म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी सोनिया सिंह अकाऊंटंट आहे. दोन्ही नोकरी करत असल्यानं त्यांची दोन मुलं अयांश आणि आरू यांना सांभाळण्यासाठी एका महिलेला ठेवलं होतं. सौरभ यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी लहान मुलगा आरूला घरीच ठेवून बाहेर गेले होते.
दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या डोळ्याला जखम झाली होती. दोघंही त्याला घेऊन डॉक्टरकडे गेले. आयांशला घरकाम करणाऱ्या महिलेसोबत त्यांनी ठेवलं होतं. याच दरम्यान संतपाच्या भरात महिलेनं या मुलाला मारहाण केल्याचा आरोप वडील सौरभ यांनी केला आहे. डॉक्टरकडे जाऊन घरी परत आल्यावर आयांश खूप रडत होता आणि त्यानं महिलेकडे घाबरून पाहिलं. जेव्हा या गोष्टीची शंका आली तेव्हा त्यांनी CCTV व्हिडीओ पाहिला. त्या आधारे या घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.