मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

डॉक्टर आहे की हैवान? विवाहित प्रेयसीला इंजेक्शनमधून दिलं विष

डॉक्टर आहे की हैवान? विवाहित प्रेयसीला इंजेक्शनमधून दिलं विष

विवाहित महिलेचा 7 सप्टेंबर रोजी गाझियाबादमधील मसूरी भागातून 31 वर्षीय संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला.

विवाहित महिलेचा 7 सप्टेंबर रोजी गाझियाबादमधील मसूरी भागातून 31 वर्षीय संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला.

विवाहित महिलेचा 7 सप्टेंबर रोजी गाझियाबादमधील मसूरी भागातून 31 वर्षीय संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला.

    गाझियाबाद, 18 ऑक्टोबर : देवमाणूस समजल्या जाणाऱ्या डॉक्टरनं अमानुषपणाचा कळस गाठला आहे. प्रेयसीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी इंजेक्शनमधून विष देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी ही महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्या तपासात नवीन ट्वीस्ट समोर आला तो म्हणजे आरोपी डॉक्टर आणि या महिलेचे असणारे प्रेमसंबंध आणि त्यातून प्रेयसीला आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी डॉक्टरनं भयंकर कट रचला आणि काटा काढला. नेमकं काय घडलं होतं? विवाहित महिलेचा 7 सप्टेंबर रोजी गाझियाबादमधील मसूरी भागातून 31 वर्षीय संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला. मसूरी पोलिसात या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार ही दाखल करण्यात आली होती. या महिलेच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला. याच दरम्यान शबाना या महिलेचे एका डॉक्टरसोबत सतत बोलणं होत असल्याची माहिती मिळाली आणि तपासाची चक्र डॉक्टरच्या दिशेनं वळली. हे वाचा-धुळे हादरलं, बेपत्ता असलेल्या 2 वर्षांच्या प्राचीचा विहिरीत आढळला मृतदेह आज तकने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी डॉक्टर त्याच्या दुसऱ्या फोनवरून या महिलेसोबत बोलत असायचा. आरोपी डॉक्टर इस्माइल हा आणि शबाना दोघंही विवाहित होते. डॉक्टरनं शबानाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हत्येचा डाव रचला आणि तिची कारमधून घेऊन जात असताना हत्या केली. तर शबानाच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार शबाना दागिने आणि लाखभर रुपयांची रक्कम घेऊन घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती परत आलीच नाही अशी माहिती मृत महिलेच्या पतीने पोलिसांना दिली आहे. डॉक्टरने शबाना फसवून तिच्याकडचे पैसे आणि दागिने लंपास केल्याचा आरोप पतीने केला आहे. या प्रकरणी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून गुन्हा देखील कबूल करून घेतला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या