इन्स्टाग्रामवरची मैत्री नडली, हॉटेलवर आधी वोडका पार्टी आणि नंतर मित्रानंच केला बलात्कार

इन्स्टाग्रामवरची मैत्री नडली, हॉटेलवर आधी वोडका पार्टी आणि नंतर मित्रानंच केला बलात्कार

इन्स्टाग्रामवर दोस्ती करणं पडलं महागात, आम्ली पदार्थ देऊन मित्रानंच केला बलात्कार

  • Share this:

आगरा, 01 फेब्रुवारी: इन्स्टाग्रामवर आपण अगदी सहज फोटो अपलोड करतो. बऱ्याचवेळा आपण मित्र-मैत्रिणींच्या मित्रांनाही फॉलो करत असतो. आपण त्याला ओळखतो की नाही यापेक्षा तो आपला इन्स्टाग्राम मित्र आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचवेळा अशा प्रकरे आपण अगदी डोळे झाकून एखाद्यासोबत मैत्री करतो आणि विश्वास घात होतो. अशा प्रकारची मैत्री आपलं आयुष्य उधद्वस्त करतं. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अशा तरुणींना अलर्ट करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरून मैत्री करणं एका युवतीला चांगलंच महागात पडलं आहे. पहिल्यादा इन्स्टाग्राम अॅपवरून युवतीसोबत मैत्री केली. मग बोलण्यातून मैत्री वाढवली आणि भेटल्यानंतर या युवतीला नशेचा पदार्थ खाण्यातून देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणानं युवतीला आम्लीपदार्थ देऊन बेशुद्ध केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारणी तपासात युवतीच्या गुप्तांगावर जखमाही आढळून आल्या आहेत.

या प्रकरणी आग्रातील ताजगंज पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित युवतीचं वय 20 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपी तरुण आग्रा येथीलच एका संस्थेतून एव्हिएशन डिप्लोमा करत असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा, दिव्यांग मुलाचा शिक्षिकेने छळ केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण आणि युवती दोघांचीही सोशल मीडियातील इन्स्टाग्राम अॅपवरून मैत्री झाली. दिवसेंदिवस दोघांमधील बोलण्याचं प्रमाण वाढत गेलं. त्यांनी भेटण्याचा प्लान केला. त्या प्लाननुसार ताजगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपी आणि पीडित युवती भेटले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यावेळी आरोपीने पीडितेला एक ड्रिंक दिले. ते घेतल्यानंतर युवती बेशुद्ध पडली. 1 तासानंतर जेव्हा युवती शुद्धीवर आली तेव्हा गुप्तांगावर जखमांचे निशाण होते. पीडित युवतीच्या घडलेला प्रकार लक्षात येताच तिने रुग्णालय गाठले असं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अलीगढ इथून अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. रुग्णालयातून आलेल्या अहवालानुसार पीडितेला भेटल्यानंतर आरोपीने अति वोडका प्यायला दिली त्यामुळे ती बेशुद्ध झाली असल्याचा अहवालातून समोर आलं आहे. तसंच पीडित युवतीवर बलात्कार करण्यात आला असून गुप्ता भागांवर अनेक जखमा असल्याचंही अहवालातून समोर आलं आहे.

हेही वाचा-7 वर्ष 182 तरुणींसोबत संभोग करून तयार केले MMS! उद्योगतींच्या मुलांना अटक

First published: February 1, 2020, 10:42 AM IST

ताज्या बातम्या