मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

‘मी बलात्कार केला नाही’ हताश अवस्थेत सुसाईड नोट लिहून अ‍ॅथलीटची आत्महत्या

‘मी बलात्कार केला नाही’ हताश अवस्थेत सुसाईड नोट लिहून अ‍ॅथलीटची आत्महत्या

बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे निराश झालेल्या  एका होतकरू अ‍ॅथलीटने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी करत होता.

बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे निराश झालेल्या एका होतकरू अ‍ॅथलीटने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी करत होता.

बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे निराश झालेल्या एका होतकरू अ‍ॅथलीटने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी करत होता.

मुंबई, 29 जून : बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे निराश झालेल्या  एका होतकरू अ‍ॅथलीटने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी भैसी गावातील राहुल नावाच्या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी झाडावरून त्याचा मृतदेह खाली उतरवला. त्याचवेळी त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.उत्तर प्रदेशमधील (UP) मुझफ्फरनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

सुसाईड नोटनुसार, तरुणाने आपल्यावरील बलात्काराचे आरोप खोटे असल्याचे सांगितलंय. तसंच याच कारणामुळे आपण नैराश्यात (Depression) गेल्याचंही त्याने म्हटलंय. खोट्या आरोपांमुळे आलेल्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले. या बलात्काराच्या आरोपामुळे तरुणाला तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगवास झाल्यामुळे आपलं आयुष्य बेकार झालंय. हा प्रकार घडल्यापासून आपण नैराश्यात असल्याचं या तरुणाने पत्रात लिहिलं आहे. ‘मी काहीही चूक केलेली नाही. ती मुलगी फक्त माझी मैत्रीण होती आणि मी तिला नोकरीसाठी बोलवलं होतं, तरीही मुलीच्या पालकांनी तिला फूस लावून माझ्याविरोधात खोटी तक्रार द्यायला लावली आणि मला शिक्षा झाली. 19 महिने तुरुंगात राहिल्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मी डिप्रेशनमध्ये आहे आणि आता मला सरकारी नोकरीही मिळू शकत नाही. त्यामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. मला माफ करा, यात माझ्या कुटुंबाची चूक नाही. मी जे काही करत आहे, ते स्वेच्छेने करत आहे,’ असं राहुलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी करा

मुलीच्या कुटुंबीयांनी पैशासाठी फसवलं त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी, असंही राहुलने म्हटलंय. तो लिहितो, ‘बाबा मला माफ करा.. माझेही स्वप्न अ‍ॅथलीट व्हायचं होतं. मी खूप मेहनत केली, देश-विदेशात अनेक पदकं जिंकली; पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी बलात्कार केला नाही. त्या मुलीनंही मी बलात्कार केला नसल्याचं म्हटलंय. मग मला शिक्षा का झाली. हा कलंक घेऊन मला जगता येणार नाही. प्रत्येकजण माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहे. मला कोणाशीही बोलता येत नाही म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. मला माफ करा मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.’

ऑलिम्पिकची तयारी करत होता राहुल

राहुलने लहान वयातच देश-परदेशातील अनेक स्पर्धांमध्ये पदकं (Medals) जिंकली होती. दिल्लीत राहून तो ऑलिम्पिकची तयारीही करत होता. दरम्यान, दिल्लीत एका मुलीच्या कुटुंबीयांनी राहुलवर तिला आमिष दाखवत पळवून नेल्याचा आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुलला त्याच्या गावातून अटक केली. त्यानंतर सुमारे 19 महिने तुरुंगात राहिल्यानंतर राहुल महिनाभरापूर्वी जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर आला आणि तेव्हापासून तो नैराश्यात होता.

मैत्रिणीवरच जडला जीव, तिने बोलणे बंद केले अन् मित्राने उचलले हे विचित्र पाऊल

पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप

राहुलच्या वडिलांनी सांगितलं की, तो बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. मुलीचे पालक त्याला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करत होते. राहुल खूप मेहनती होता आणि तो श्रीलंका आणि नेपाळसह अनेक देशांत स्पर्धेसाठी गेला होता. याआधीही आम्ही मुलीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये दिले होते, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सुसाईड नोटच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलंय.

First published:

Tags: Crime news, Rape, Uttar pardesh