विद्यार्थ्यांची गुंडगिरी; छेड काढली म्हणून कानशिलात लगावणाऱ्या शिक्षकालाच दिला चोप

विद्यार्थ्यांची गुंडगिरी; छेड काढली म्हणून कानशिलात लगावणाऱ्या शिक्षकालाच दिला चोप

शिक्षकाला बेदम मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल.

  • Share this:

प्रयागराज, 06 नोव्हेंबर: मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला मारल्यानं शिक्षकाची बेदम मारहाण केल्याचा प्रकार प्रयागराज जिल्ह्यात घडला. सोरांव गावातील एका महाविद्यालात विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून शिक्षकाने कानशिलात भडकवली आणि वर्गातील विद्यार्थी भडकले. संतप्त विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षकाला चोप दिला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा निषेध करत कॉलेजच्या खिडक्या आणि दारांची तोडफोड केली. ह्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना सोमवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

सोरांव इथल्या आदर्श जनता इंटर महाविद्यालयात हेल्थ चेकअप शिबिर ठेवण्यात आले होते. ह्या शिबिरमध्ये भाग घेण्यासाठी मुलीही आल्या होत्या. त्यावेळी युवकानं गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाने युवकाच्या सणसणीत कानशिलात लगावली. हे पाहाताच युवकाचे मित्र शिक्षकावर तुटून पडले. त्यांनी गावातील काही स्थानिकांना बोलवून काठीने शिक्षकाला बेदम मारहाण केली. या प्रकार शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण आणि तोडफोड करणारे विद्यार्थी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. ग्रामस्थांनीही गुंडगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची साथ देत लाथा-बुक्क्यांनी शिक्षकाला मारहाण केली. ग्रामस्थांनी कॉलेजमधील सामानाची आणि इमारतीचे दरवाजे, खिडक्यांचीही तोडफोड केली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरू आहे.

First published: November 6, 2019, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading