Elec-widget

धक्कादायक! नेत्याच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या; खूनाचं कारण ठरलं कुत्रा

धक्कादायक! नेत्याच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या; खूनाचं कारण ठरलं कुत्रा

धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून लोक जनशक्ती पक्षातील नेत्याच्या मुलाची बेदम मारहाण करून हत्या.

  • Share this:

सहारनपूर, 04 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे कुत्रा हे एकमेव कारण होतं. राग आणि बाचाबाचं रुपांतर भांडणात बदललं आणि तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या झालेला तरुण लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याचा मुलगा होता. यामध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याला आणि त्यांची पत्नी जखमी झाली आहे. भटनागर पोलिसांच्या म्हणण्यानुसार दामोदरपुरी इथे गुरुवारी संध्याकाळी कुत्र्याच्या विष्ठेवरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये नेत्याच्या मुलाची तरुणांनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे.

कशामुळे झाला वाद..

लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेश सचिव हरिओम पासवान यांच्या मुलाने कुत्रा पाळला होता. त्यांच्या शेजारच्यांनी कुत्राच्या विष्ठेवरून वाद घालण्यास सुरूवात केली. दररोज होणाऱ्या बाचाबाचीचं रुपांतर वादामध्ये झालं. शेजारी राहणाऱ्या शुभम नावाच्या तरुणाने आपल्या साथीदारांच्या मदतीनं पासवान यांच्या मुलाला बेदम मारहाण करून हत्या केली. या प्रकरणात पासवान आणि त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत. शुभम आणि त्यांच्या साथीदारांनी लाठ्या, रॉडने बेदम मारहाण केली. जखमी पासवान दाम्पत्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्लेखोरांनी ठोकली धूम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या घटनेनंतर शुभम त्याच्या कुटुंबासह फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून शुभम आणि साथीदारांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांची अधिक कुमक तैनात केली असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading...

क्षुल्लक कारणावरून झाली बाचाबाची...औरंगाबादमध्ये एका कुटुंबातील तिघांचा खून

एकाच कुटुंबातील तिघांवर एकाने धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. यात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत घटना ही घटना घडली आहे. मारेकरी अमोल बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिकलठाणा भागातील चौधरी कॉलनीत एकाच कुटुंबातील तिघांचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दिनकर भिकाजी बोराडे (वय-55), कमल दिनकर बोराडे(वय-50) आणि भगवान दिनकर बोराडे (वय-25)अशी मृतांची नावे आहेत.दिनकर भिकाजी बोराडे आपली पत्नी कमल दिनकर बोराडे आणि मुलगा भगवान दिनकर बोराडे यांच्यासोबत राहत होते. आज संध्याकाळी ते तिघे घरात असताना त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी अमोल बोर्डे त्यांच्या घरात घुसला आणि कोणालाही काही समजण्या आधी त्याने त्या तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.अचानक झालेल्या या हल्यामुळे बोराडे कुटुंबीयांना स्वतःचा बचाव करता आला नाही. यात हल्यात त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 09:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...