अनैतिक संबंधांमुळे तळपायाची आग मस्तकात, पत्नी आणि प्रियकराला कायमचं संपवलं

अनैतिक संबंधांमुळे तळपायाची आग मस्तकात, पत्नी आणि प्रियकराला कायमचं संपवलं

अनैतिक संबंधातून एकाच जिल्ह्यात तीन घटना, दुहेरी हत्येमुळे परिसरात खळबळ.

  • Share this:

कानपूर, 11 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये दोन अनैतिक प्रेमसंबंधांमुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत पतीने आपल्या बायकोला परपुरुषासोबत पाहिल्यानं त्याचा राग अनावर झाला आणि त्याने दोघांना मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये पतीने प्रियकर आणि स्वत:च्या बायकोलाच संपवल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

तळपायाची आग मस्तकात पत्नी आणि प्रियकराची निर्घृण हत्या

शुक्रवारी झालेल्या दुहेरी हत्येनं कानपूर हादरलं आहे. या हत्येचं कारण होतं पत्नीचे परपुरुषासोबत असणारे अनैतिक संबंध.

आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं कळताच पती राजेश कुरील याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या पत्नीचे संबंध शेजारी असलेल्या गावातील मनीष नावाच्या तरुणासोबत असल्याची कबूली आरोपी राजेशने दिली आहे. या कारणावरून दोघांमध्ये रोज खटके उडत होते. मात्र पत्नी ऐकण्यास तयार नसल्यानं आरोपी राजेशचा राग अनावर झाला आणि त्याने धारदार शस्त्रानं गळा चिरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोस्टमार्टमसाठी दोन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. ' माझ्या पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. मला अटक करा', अशी स्वत: आरोपीने पोलिसांना फोन करू या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

परपुरुषासोबत फिरताना दिसली पत्नी, दोघांची केली धुलाई

उत्तर प्रदेशातील कानपूर इथे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं कळताच पतीचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला परपुरुषासोबत फिरताना पकडलं आणि दोघांनाही धडा शिकवण्याच्या हेतूने मारहाण करण्यास सुरूवात केली. पत्नी आणि तिचा प्रियकर ओला कॅबमधून फिरत असताना पतीने पकडलं आणि कार थांबवून दोघांना उतरवलं. प्रियकराला जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी पतीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दोघांची धुलाई करण्यास सुरुवात करताच पत्नीने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच कर्नलगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VIDEO : नवी मुंबईत झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला, अंगावर पडले लाल डाग

Published by: Kranti Kanetkar
First published: October 11, 2019, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading