होणाऱ्या नवऱ्याचा 'नागीन' डान्स पाहून संतापली नवरी; मंडपात दिला लग्नाला नकार

होणाऱ्या नवऱ्याचा 'नागीन' डान्स पाहून संतापली नवरी; मंडपात दिला लग्नाला नकार

उत्तर भारतात लग्नाच्या वरातीत प्रसिद्ध असणारा नागीन डान्स लग्न मोडण्याचं ठरलं महत्त्वाचं कारण.

  • Share this:

बरेली, 11 नोव्हेंबर: उत्तर भारतातील लग्न सोहळ्यांमध्ये वरातीमध्ये नागीन डान्स करण्याची परंपरा आहे. उत्तर भारतातील हाच प्रसिद्ध नागीन डान्स मात्र उत्तर प्रदेशात लग्न मोडण्याचं कारण ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तुम्हालाही ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे. लग्नाच्या वरातीत नागीन डान्स आवडला नाही म्हणून भर मंडपात लग्न मोडल्याचा प्रकार लखीमपुरा खीरी इथे घडला. याआधीही 2017मध्ये शाहजहांपूरमध्ये अशाप्रकारची घटना समोर आली होती.

दारुच्या नशेत धुंद असलेला नवरदेव आपल्या मित्रांसोबत वरातीमध्ये नागीन डान्स करत होता. यावेळी वरमाला गाळ्यात घालण्याची वेळ टळून जात असल्यामुळे कन्येकडील नातेवाईकांना नवरदेवाला त्याचा डान्स थांबवण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी नवरदेवानं त्यांचं न ऐकता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरु लागला. बाचाबाचीनंतर दोन्ही परिवारांमधील तणाव शांत करुन वरमाला नवरा आणि नवरीने एकमेकांना घातली.

नवरीचे पेशन्स तेव्हा सुटले जेव्हा वरमाला घालून पुन्हा नवरदेव नागीन डान्स करायला लागला. हा सगळा प्रकार पाहून नवरीचा पार सुटला आणि तिने साफ लग्नास नकार देत मंडपातून बाहेर गेली. नवऱ्याची अशी हुल्लडबाजी पाहून नवऱ्या मुलीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने मंडपातच लग्न मोडलं. लग्न मोडल्याचं नवरदेवाच्या लक्षात येताच त्याने सर्वांसमोर राडा केला. अरेरावीची भाषा सुरू केली. भर लग्नमंडपातील सुरू असलेल्या या धिंगाण्याची माहिती पोलिसांना समजताच पाकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कुटुंबांची बाजू ऐकून घेतली मात्र दोन्ही पक्षांची तक्रार दाखल करून घेण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. घडलेल्या प्रकारामुळे लग्न तर मोडलंच पण नवरदेवाला त्याच्या नागीन डान्समुळे नवरीसाठी आणलेली वरात स्वत:च एकट्यानं घरी घेऊन जावी लागली.

2017मध्येही नागीन डान्समुळे मोडलं होतं लग्न

उत्तर प्रदेशमध्ये नागीन डान्समुळे नवरदेवाचं लग्न मोडल्याची घटना 2017 साली घडली होती. शाहजहांपूर इथे नवरा आपल्या नागीन डान्सने नवरीला आकर्षित करण्यात अपयशी ठरला आणि मंडपातच लग्न मोडलं. नवरदेवाच्या या अजब नागीन डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

Published by: Kranti Kanetkar
First published: November 11, 2019, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading