बदायू, 06 जानेवारी : वाशीमध्ये तरुणीसोबत झालेल्या बलात्कारानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विकृतीचा कळस गाठणारी आणि निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आल्यानं देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी या महिलेचे अक्षरश: लचके तोडले.
पूजा करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या महिलेच्या शवविच्छेदनातून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
In the case of the death of a 50 year old woman under suspicious circumstances, an accused has been arrested and a has been case registered against him under Sections 302 and 376D of the Indian Penal Code: SSP Badaun pic.twitter.com/GLblQ6HBgY
— ANI UP (@ANINewsUP) January 6, 2021
या प्रकरणी पोलिसांनी महंत याच्यासह त्याच्या एका शिष्य आणि चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. निर्भयाच्या या पुनरावृत्तीमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बदायू इथे घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना अघैती पोलीस ठाण्या परिसरात घडली आहे. अघैती गावातील महिला रविवारी नेहमीप्रमाणे जवळच्या गावातील मंदिरात पूजेसाठी गेली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने कारमधून या महिलेचा मृतदेह आणला आणि त्यानंतर तिला घराजवळ टाकून फरार झाला. याबाबत स्थानिकांनी माहिती देऊनही वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे.
बदायू सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. पीडितेचा मृतदेह 18 तासांनी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यातील प्रभारीवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. तर वरिष्ठ पोलिसांनी 4 जणांची टीम नेमली असून आरोपीचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh, Yogi Aadityanath