Home /News /crime /

धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून झाला वाद; बेदम मारहाण करत महिलेची जीभच छाटली

धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून झाला वाद; बेदम मारहाण करत महिलेची जीभच छाटली

महिलेचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    अयोध्या, 17 ऑक्टोबर : क्षुल्लक कारणावरून वाद झाला, तो मारहाण आणि अगदी जीव घेण्यापर्यंत पोहोचला. या भांडणात महिलेची जीभच छाटण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे अयोध्येतील (Ayodhya) आशापूर सरैया गावात. सार्वजनिक जागेच्या साफसफाईवरून वाद झाला आणि एका महिलेला बेदम मारहाण करत तिची जीभ कापली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. आशापूर सरैया गावातील सुनिता वर्मा आपलं धान ठेवण्यासाठी घरासमोरील सार्वजनिक जागेची साफसफाई करत होती. त्यावेळी गावातीलच अर्जुन नावाच्या व्यक्तीने तिला रोखलं. तिथं साफसफाई करण्यास विरोध केला. मात्र सुनितानं तिचं ऐकलं नाही. त्यामुळे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने सुनिताला मारहाण केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या गळ्यावर पाय ठेवला, त्यावेळी सुनिताची जीभ बाहेर आली तर तिची जीभच त्यांनी कापून टाकली. वेदनेनं व्याकूळ झालेली सुनिता ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून गावातील इतर लोक धावत आले. त्यांनी सुनिताचा जीव वाचवला. तिला लगेलच गोसाईगंजमधील आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. तिथं प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. हे वाचा - भयंकर! महिलेनं 25 वेळा चाकूनं सपासप केला वार, पोलीस ठाण्यात फोन लावून सांगितलं.. पीडितेचा पती रामप्यारे वर्माने पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि पत्नीला मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने अर्जुन आणि चंद्रकात नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिलेली आहे. त्यांच्याविरोधात 326 कलमाअंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांना अटक केलं जाईल. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा तपास करत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या