मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भर रस्त्यात प्रियकराने घातल्या प्रेयसीला गोळ्या, नंतर त्याच बंदुकीने केली आत्महत्या

भर रस्त्यात प्रियकराने घातल्या प्रेयसीला गोळ्या, नंतर त्याच बंदुकीने केली आत्महत्या

घटनास्थळी एक तरुण आपल्या डोक्याला पिस्तूल लावून उभा होता. क्षणार्धात त्याने गोळी झाडली आणि आत्महत्या केली.

घटनास्थळी एक तरुण आपल्या डोक्याला पिस्तूल लावून उभा होता. क्षणार्धात त्याने गोळी झाडली आणि आत्महत्या केली.

घटनास्थळी एक तरुण आपल्या डोक्याला पिस्तूल लावून उभा होता. क्षणार्धात त्याने गोळी झाडली आणि आत्महत्या केली.

  • Published by:  Ajay Kautikwar
प्रयागराज 16 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातला प्रयागराज हा जिल्हा हत्या आणि आत्महत्येच्या एका घटनेने हादरुन गेलाय. प्रियकराने बाजारातल्या भर रस्त्यात प्रेयसीची गोळी घालून हत्या केली आणि त्याच पिस्तुलाने स्वत:आत्महत्ये केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. बाजारात गर्दी असतानाच ही घटना घडल्याने लोकांनाही प्रचंड धक्का बसलाय. प्रयागराज जिल्ह्यातल्या झुंसी जवळच्या हवेलिया या गावात ही घटना घडली. त्या तरुणीचे वडिल हे गावतले नामांकित वकील आहेत. लग्नावरून वाद झाल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. हवेलिया या गावातल्या बाजारात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. लोक खरेदी करण्यात मग्न होते. अशातच गोळीबाराचा आवाज आल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी एक तरुण आपल्या डोक्याला पिस्तूल लावून उभा होता. क्षणार्धात त्याने गोळी झाडली आणि आत्महत्या केली. कॉन्स्टेबल आईने विचारही नव्हता केला असं घडलं, लेकीनेच जन्मदात्रीला संपवलं शिनू असं त्या तरुणाचं नाव असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. शिनू आणि ती तरुणी आपसांत बोलत होते. त्यानंतर त्यांच्यात भांडण झालं आणि नंतर तरुणाने आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि नंतर आत्महत्या केली. त्याच्या जवळ काही चिठ्ठी सापडल्याची नोंद पोलिसांनी अजुन केलेली नाही. पोलिसांनी दोघांनाही सरकारही हॉस्पिटलमध्ये तातडीे हलवलं परंतू तिथे त्या दोघांनाही मृत असल्याचं घोषीत केलं. भांडणात झाला राग अनावर पतीने पत्नीच्या तोंडात कोंबला डांबर गोळ्यांचा कूट पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून ते आता घटनेचा तपास करत आहेत. शिनू आणि ती मुलगी हे दोघही दोन वेगवेगळ्या संप्रदायांचे होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच वादातून हत्या झाली असावी अशी माहिती प्राथमिक तपास पुढे आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस त्या दोघांच्याही कुटुंबीयाकडे चौकशी करत आहेत. यात इतर काही शक्यता आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Uttar pradesh

पुढील बातम्या