22 वर्षांच्या तरुणाचं 60 वर्षांच्या महिलेशी होते संबंध, पत्नीने रंगेहात पकडलं आणि...

22 वर्षांच्या तरुणाचं 60 वर्षांच्या महिलेशी होते संबंध, पत्नीने रंगेहात पकडलं आणि...

22 वर्षीय प्रियकराची सुटका करण्यासाठी 60 वर्षांची त्याची प्रेयसी पोलिसांसमोर उभी राहिली. हे पाहून पोलिसही चक्रावले.

  • Share this:

आग्रा, 24 जानेवारी : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात, मात्र या याच प्रेमामुळे कधी कधी लोकांचे संसारही उद्धवस्त होतात. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये नुकताच घडला. आग्रा येथील पोलिस स्टेशन आझमउद्दौला येथे एका 22 वर्षीय प्रियकराची सुटका करण्यासाठी 60 वर्षांची त्याची प्रेयसी पोलिसांसमोर उभी राहिली. हे पाहून पोलिसही चक्रावले.

दरम्यान, हा तरुण तिचा प्रियकर असल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. याआधी या तरुणाविरोधात त्याच्याच बायकोनं विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आरोप करत तक्रार केली होती. म्हणून पोलिसांनी या 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी त्याच्या सुटकेसाठी चक्क त्याची 60 वर्षांची प्रेयसी पोलीस स्थानकात पोहचली. याच तरुणावर 60 वर्षीय महिलेच्या प्रेमात आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

वाचा-चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

खरं तर, एका महिलेने तिच्या वैवाहिक जीवन उद्धवस्त केल्याची तक्रार केली होती. या महिलेने नवरा हा या महिलेच्या घरात राहतो. तिनं त्याच्यावर जादू केली आणि त्याला वश केले आहे. एवढेच नाही तर तिच्या सांगण्यावरून पतीने आपल्याच पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले. हे तरुणाला सोडवणयासाठी तरुणी पोलीस स्थानकात पोहचली. या महिलेने प्रेम हा गुन्हा नाही, असे पोलिसांना सांगितले.

वाचा-'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, सोलापूरमध्ये बसच्या काचा फोडल्या

महिलेला 7 मुले, 5 नातवंडे: तरूणाची बायको

या युवकाची पत्नी म्हणाली की ही महिला 7 मुलांची आई आहे, तिला 5 नातवंडे आहेत. पत्नीने पुन्हा तक्रार केल्यास तिला तुरूंगात पाठविले जाईल, असे निर्देश देऊन पोलिसांनी त्या तरूणाला सोडले. याप्रकरणी पोलिस ठाण्याचे प्रभारी उदयवीरसिंग मलिक यांनी सांगितले की, या तरूणाच्या वडिलांनी त्या महिलेकडे जाणे थांबवले आणि त्या युवकाच्या वडिलांशी भांडण झाले. त्या युवकाने वडिलांना मारहाण केली. त्यामुळे कलम 151 अन्वये या युवकाविरोधात दंड आकारण्यात आला आहे.

First published: January 24, 2020, 12:11 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या