आई लग्नासाठी घेऊन गेली नाही म्हणून 8 वर्षांच्या मुलीनं उचललं धक्कादायक पाऊल

आई लग्नासाठी घेऊन गेली नाही म्हणून 8 वर्षांच्या मुलीनं उचललं धक्कादायक पाऊल

आईने आपल्या 8 वर्षांच्या मुलीला लग्नासाठी घेऊन जाण्यास नकार दिल्याने बुधवारी तिच्या घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

  • Share this:

मुजफ्फरनगर, 26 नोव्हेंबर : आईने आपल्या 8 वर्षांच्या मुलीला लग्नासाठी घेऊन जाण्यास नकार दिल्याने बुधवारी तिच्या घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात चार्थावल पोलिस ठाण्याअंतर्गत निर्धाना गावात ही घटना घडली.

स्टेशन हाऊस ऑफिसर धर्मेन्द्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचेपर्यंत मुलीच्या कुटुंबीयांनी आधीच मृतदेह पुरला होता. पोलिसांनी सांगितले की मुलगी तिच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी तिच्या आईला पाटवी गावात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होती. परंतु आईने लग्न समारंभात घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने दरवाजा आतून बंद केले होते. कुटुंबातील सदस्य आणि काही स्थानिक यांनी दरवाजा तोडला. आणि तिथे ती लटकलेली आढळली. अशी माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे.

हे वाचा-मुंबई, रत्नागिरी, देवगडच्या किनाऱ्यांवर निळ्या चमचमत्या लाटा; Blue tide काय आहे?

इतक्या लहान वयात हे असं टोकाचं पाऊल कुठलीही लहान मुलगी कसं उचलू शकते याबाबत आता सर्वांनाच चिंता लागली आहे. नक्कीच आत्महत्या करण्याचे कारण हेच आहे. की अजून काही दुसरे आहे याबाबत आता कसून चौकशी होणार आहेत. यामध्ये मुलीचे संबंधित सर्व नातेवाईक व गावातील लोकांची चौकशी केली जाणार आहे.

हल्ली सोशल मीडियामुळे या अशा सर्व गोष्टी मुलांच्या कानावर पडत आहेत. त्यामुळे इतक्या लहान वयात मुलं इतके टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेत आहे. आपला स्वतःचा जीव स्वतःच्या हाताने संपवला आहे इतकी सोपी गोष्ट नाही तरी इतक्या लहान वयात मुलांना निर्णय घेतात. म्हणजे त्यांच्या मनावर या सर्व गोष्टींचा किती परिणाम होत असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. हल्ली छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्या करण्याच्या बऱ्याच बातम्या समोर येत आहेत. कधीकधी आई-वडील या गोष्टींची चर्चा आपल्या मुलांसमोर करतात त्यामुळेच मुलांना या बाबतीत आता कळू लागले आहे. याचा परिणाम आता मुलांवर होऊ लागला आहे व मुलं अशी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेत आहेत. जे की आत्ताच्या पिढीला खूपच धोकादायक ठरणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 26, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या