2 गुंडांचा वकिलावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडनं केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO VIRAL

2 गुंडांचा वकिलावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडनं केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO VIRAL

मारहाणीत वकील जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. व्हिडीओच्या मदतीनं आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share this:

झांसी, 07 नोव्हेंबर : वकिलाला भररस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केला आणि बेदम मारहाण केली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील झांसी इथे 2 गुंडांनी भररस्त्यात एका वकिलावर जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये वकील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या वकिलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ही धक्कादायक घटना प्रेम नगर पोलीस ठाणे परिसर आहे.

चिरगाव पोलीस स्टेशन परिसरातील वकील अनूप शिवहरे हे कामानिमित्त प्रेम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामासाठी आले होते. त्यावेळी 2 अज्ञात तरुणांनी वकील अनूप शिवहरे यांना घेरलं. तिथे दोघांमध्ये खूप बाचाबाची झाली. दोघांनी लोखंडी रॉडनं त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी वकिलाच्या ड्रायव्हरने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलवर कैद केला आणि पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी वकील जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. व्हिडीओच्या मदतीनं आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यासाठी एका राजकीय पक्षातील आमदाराला वकिलानं जबाबदार धरल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 7, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या